संगमनेर/प्रतिनिधी ः तुम्ही कोणी धीर सोडू नका. संपूर्ण शिवसेना ताकदीने तुमच्यासोबत आहे. सरकारला एक मुदत देऊ. यात काही नाही झाले, तर मग आपण आंदोलन
संगमनेर/प्रतिनिधी ः तुम्ही कोणी धीर सोडू नका. संपूर्ण शिवसेना ताकदीने तुमच्यासोबत आहे. सरकारला एक मुदत देऊ. यात काही नाही झाले, तर मग आपण आंदोलन असेल, अथवा जे काय करावे लागेल, ते करू अशा शब्दात माजी मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्तांची संवाद साधत आपल्या शिवसैनिकांना, कार्यकर्त्यांना शेतकर्यांसोबत राहण्याचा सल्ला दिला.
संगमनेर, कोपरगाव, शिर्डीच्या दुष्काळग्रस्त भागाच्या पाहणी दौर्यावर सोबत पाऊस घेऊनच आलेले शिवसेनाप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भर पावसातच शुक्रवारी संगमनेर तालुक्यातील वडझरी येथील दुष्काळग्रस्तांशी संवाद साधत शेतकर्यांना धीर दिला. शेताच्या बांधावरच दुष्काळग्रस्तांसोबत संवाद साधताना त्यांनी येथील पीक परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पिक विमा, नुकसान भरपाईबाबत माहिती विचारली. दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या शेती पिकाचे पंचनामे कधी होणार यासंदर्भात मला माहिती द्या. किंवा नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करायला लोक येतात की नाही, पिक विम्याचे पैसे मिळतात की नाही मिळत, याबाबत मला पाच-दहा लोकांनी मुंबईत भेटून माहिती द्यावी. सरकारकडून यासंदर्भात काय हालचाली होतात ते बघूया. ठाकरे यांनी शेतकर्यांना विचारले की, या हंगामात तुम्हाला किती वेळा पेरण्या कराव्या लागल्या. यावर शेतकर्यांनी दोन वेळा पेरणी करावी लागल्याचे सांगितले. यावर ठाकरे म्हणाले, तुम्ही दोन वेळा पेरणी केली. तुमच्या डोक्यावर पुन्हा कर्ज वाढले. पीक विम्याचे तुम्ही हप्ते भरले होते का? तुम्हाला आता विम्याचे पैसे मिळालेत का? गेल्या वर्षीची नुकसान भरपाई देखील मिळाली नसल्याचे शेतकर्यांनी यावेळी ठाकरे यांना सांगितले. यावेळी ठाकरे यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार विनायक राऊत, सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मुजीब शेख व प्रमोद लबडे, संगमनेर शहर प्रमुख अमर कतारी, संगमनेर तालुका प्रमुख भाऊसाहेब हासे आदींसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS