Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक हे खर्‍या अर्थाने जलक्रांतीचे जनक ः  पवार

पाथर्डी/प्रतिनिधीः शेती सुपीक करावयाची असेल तर डोंगरावरच पाणी अडवणे गरजेचे आहे. हे ओळखून आपली धोरणे आखणारे माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक हे खर्‍या

पतसंस्था चालविताना घ्यावयाची दक्षता यावर विचार मंथन बैठक
श्रीरामकृष्ण सोसायटीला 3 कोटी 87 लाखाचा नफा
नगर अर्बनचे संचालक कोठारींसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल ; बायोडिझेलचा बेकायदेशीर वापर केल्याची तक्रार

पाथर्डी/प्रतिनिधीः शेती सुपीक करावयाची असेल तर डोंगरावरच पाणी अडवणे गरजेचे आहे. हे ओळखून आपली धोरणे आखणारे माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक हे खर्‍या अर्थाने जलक्रांतीचे जनक ठरतात. असे महत्वपुर्ण वक्तव्य बंजारा समाजाचे नेते तथा पंचायत समितीचे माजी सदस्य विष्णुपंत पवार यांनी केले.
राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्या जयंती निमित्त पाथर्डी तालुका बंजारा समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते.
यावेळी भटक्या विमुक्ताचे नेते माजी नगरसेवक नारायण बाबा जाधव यांच्या हस्ते सुधाकर नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते प्रभाकर पवार, गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश चव्हाण, शिक्षक नेते विलास पवार, माजी सरपंच संजय पवार ,ग्रंथालय कृती समिती अध्यक्ष संजय कराळे,गोर गावंळ्या दलाचे जिल्हाध्यक्ष मोहन पवार,विलास चव्हाण,विजय पवार,उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक आर.सी.चव्हाण यांनी केले. तर आभार  गोरसेनेचे तालुका प्रमुख किशोर राठोड यांनी मानले

COMMENTS