Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युको बँकेच्या माजी अध्यक्षांना ईडीकडून अटक

नवी दिल्ली : युको बँकेचे माजी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुबोध कुमार गोयल यांना सोमवारी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मनी लॉन्डरिंग प्रक

समंथा प्रभू लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री
विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमती वाढतात; विकासकामे वेळेत मार्गी लावावी : उपमुख्यमंत्री पवार यांचे निर्देश
लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

नवी दिल्ली : युको बँकेचे माजी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक सुबोध कुमार गोयल यांना सोमवारी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक केली आहे. त्यांच्यावर कोलकाता येथील एका कंपनीशी संबंधित 6 हजार 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या बँक कर्ज फसवणूक प्रकरणाचा आरोप आहे.
ईडीने अटक केल्यानंतर पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 21 मे पर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. या प्रकरणा संदर्भातील चौकशीचा भाग म्हणून ईडीने एप्रिलमध्येच सुबोध कुमार गोयल आणि इतर काही व्यक्तींच्या मालमत्तांवर छापे टाकले होते.

COMMENTS