Homeताज्या बातम्याविदेश

ज्वालामुखीमुळे समुद्रात नव्या बेटाची निर्मिती

जपानची राजधानी टोकियोच्या दक्षिणेस 1000 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रशांत महासागरात पाण्याखालील ज्वालामुखीचा उद्रेक होऊन ढिगारा बाहेर पडला त्यामु

सत्ताबदल अटळ, परंतु..!
BREAKING: आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ | LokNews24
अहमदनगरमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त ; एकाला अटक

जपानची राजधानी टोकियोच्या दक्षिणेस 1000 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रशांत महासागरात पाण्याखालील ज्वालामुखीचा उद्रेक होऊन ढिगारा बाहेर पडला त्यामुळे एक नवीन बेट तयार झाले. ज्याचा आकार किमान 200 मीटर लांब आहे . हे बेट इवोटो बेटाच्या किनाऱ्यापासून थोडे दूर आहे. पूर्वी इवोटोला इवोजिमा म्हणतात. पॅसिफिक महासागरात 1 नोव्हेंबर रोजी ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर या बेटाची निर्मिती झाली. इवोटोवर सध्या जपानी नौदलाचा एअरबेस आहे. ज्याचा दुसऱ्या महायुद्धात मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. तळावर राहणार्‍या नौसैनिकांनी सांगितले की, त्यांना प्रथम मोठा आवाज ऐकू आला.यानंतर ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर समुद्रात हे बेट तयार होत असल्याचे त्यांनी पाहिले. जपानच्या हवामान खात्याने सांगितले की 21 ऑक्टोबरपासून इवातो बेटाच्या जवळपास हलके भूकंप होत आहेत. पण पाण्याखालच्या ज्वालामुखीचा उद्रेक होईल असे वाटले नव्हते.

COMMENTS