Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कायदा व सुव्यवस्थेचे पालन स्वतःपासून करावे

पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे प्रतिपादन

कोपरगाव - दैनंदिन जीवनात प्रत्येक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची आचार संहिता पाळली तर यशस्वी जीवन जगण्यास अडचण निर्माण होत नाही. विद्यार्थ्यांनी शाल

टॉप हंड्रेड थकबाकीदारांमध्ये…नगर टॉपवर
प्राचार्य शंकरराव अनारसे यांचे  शब्दवैभव पुस्तक संस्कारशील
आजचे राशीचक्र सोमवार,o६डिसेंबर २०२१ अवश्य पहा | LokNews24

कोपरगाव – दैनंदिन जीवनात प्रत्येक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेची आचार संहिता पाळली तर यशस्वी जीवन जगण्यास अडचण निर्माण होत नाही. विद्यार्थ्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासुनच कायदा व सुव्यवस्थेचे पालन स्वतः पासूनच करावे, म्हणजे सद्य परीस्थिती आणि भविष्यातही कोणतीही समस्या निर्माण होत नाही, अन्यथा आपले करिअर बरबाद होवू शकते, असे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी केले.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या स्थापनेस 40 वर्षे झाली असून 2023-24  हे वर्ष ‘रूबी जुबली’ वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या अनुषंगाने संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित विविध संस्था विध्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवित आहेत. याच उपक्रमांतर्गत संजीवनी ज्युनियर कॉलेजच्या वतीने विध्यार्थ्यांसाठी ‘कायदा व सुव्यवस्था’ विषयावर व्याख्यान आयोजीत केले होते. या कार्यक्रमात देशमुख प्रमुख व्याख्याते म्हणुन बोलत होते. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक महेश येसेकर आणि प्राचार्य डॉ. आर. एस. शेंडगे व्यासपीठावर उपस्थित होते.
देशमुख पुढे म्हणाले की, अनेक तरूण वेगाने वाहन चालवुन  स्टंटबाजीचे प्रदर्शन  करण्याचा प्रयत्न करतात. परंतु अशा  परीस्थितीमध्ये ते पकडले गेले किंवा अपघात झाला आणि त्यांच्याकडे वाहन परवानाही नाही आणि वय वर्षे 18 ही पुर्ण नाही, अशा परीस्थितीमध्ये पालकांनाच जबाबदार धरण्यात येते. आपल्या स्टंटबाजीमुळे निरपराध व्यक्तींचा जीव धोक्यात येवु शकतो. फेसबुक, इन्स्टाग्राम चे काही लोक बनावट अकौंट तयार करून इतरांना फसवितात किंवा एखाद्याची बदनामी करण्यासाठी वापर करतात. असे कोणी करूच नये कारण अशा  प्रकारच्या सायबर क्राईम मध्ये कधीना कधी पकडल्या जातेच. उपनिरीक्षक येसेकर म्हणाले की सोशल मीडिया (समाज माध्यम) मध्ये आजची तरूणाई गुरफटली असुन तंत्रज्ञानाचे फायदे असले तरी तसे तोटेही आहेत. आपण सोशल मीडियाच्या किती आहारी जायचे, हे आपण आपल्या सत्सक विवेक बुध्दीने ठरविले पाहीजे. विध्यार्थी अवस्था ही भविष्यात  आपले करीअर घडविण्यासाठीचा सुवर्णकाळ असतो. चांगला अभ्यास करून अनेक विध्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये आपली गुणवत्ता व विद्वत्ता सिध्द करून सरकारी नोकरीस पात्र होतात. अशा  उमेदवारांच्या नेमणुकीच्या अगोदर पोलीस व्हेरीफिकेशन होते. जर अशा  उमेदवाराची पोलीस दप्तरी गुन्ह्याची नोंद असेल तर त्याला नोकरी मिळू शकत नाही. म्हणून आपण भविष्यात कोणत्याही गुन्ह्यात गुन्ह्याात अडकणार नाही, याची काळजी घ्यावी असे येसेकर शेवटी म्हणाले.

COMMENTS