Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्ञानवर्धिनी शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष : जोशी

अकोले : ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळा ही सर्वच समाज घटकातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे वैयक्तीक लक्ष दिले जाते. लेखन, वाचन, अंकगण

गृहभेटीच्या माध्यमातून मतदानाचे प्रमाण वाढवूया
सुरेशराव कोते यांना राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
दैनिक लोकमंथन l बोठेनं मेव्हण्याला हुतात्मा दाखवून घेतला पाच लाखांचा लाभ

अकोले : ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळा ही सर्वच समाज घटकातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकडे वैयक्तीक लक्ष दिले जाते. लेखन, वाचन, अंकगणित, मराठी, इंग्रजी बरोबरच विविध कला व क्रीडा गुणांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. म्हणूनच विविध क्षेत्रात विद्यार्थी यश संपादन करत आहेत. स्थानिक मान्यवरांचे या शाळेस नेहमीच अर्थिक सहकार्य मिळत असल्याचे प्रतिपादन वैशाली संजय जोशी यांनी केले.

 हिंद सेवा मंडळाच्या अकोले विभागातील ज्ञानवर्धिनी प्राथमिक शाळेचा 36 वे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना वैशाली जोशी बोलत होत्या. या कार्यकमाचे प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. किरण लहामटे उपस्थित होते. त्यांनी शालेय विद्यार्थी यांचेबरोबर खेळ व्यायाम अभ्यास व संस्कार याबाबत संवाद साधला.

याप्रसंगी शाळेच्या ज्येष्ठ संचालिका सुधा देशपांडे यांनी बालकमंदिर विभागासाठी ८ सायकल, प्रभावती महाले व श्रीकृष्ण जोशी व पुणे येथील श्रावी कुलकर्णी यांनी पारितोषिक वितरण व गरजू विद्यार्थ्यांसाठी अर्थिक सहकार्य केले.

यावेळी योगिता कुलकर्णी,  कल्याण लकडे,  भिकाजी कांबळे,  रामेश्वर रासने, स्मिता मुंदडा,  मोरेश्वर धमाधिकारी, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, अमोल वैद्य, दिलीप शहा, सुधा देशपांडे, पुष्पा वाणी,सुरेखा धर्माधिकारी, माजी प्राचार्य संतोष कचरे, प्राचार्या चित्रा कांबळे, पर्यवेक्षक सुधीर जोशी, अण्णा संत आदि मान्यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालन सोनाली मालवणकर यांनी केले. मान्यवरांचा परिचय दत्ता पोपेरे यांनी, स्वागत व प्रास्तविक मुख्याध्यापक रावसाहेब नवले यांनी केले. अध्यक्षीय सूचना किरण शेळके यांनी मांडली तर आभार बाळासाहेब मांडे यांनी मानले.

COMMENTS