नवी दिल्ली ः गुजरातच्या सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. द्वारकाच्या पनेली गावात पुरात अडकल

नवी दिल्ली ः गुजरातच्या सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. द्वारकाच्या पनेली गावात पुरात अडकलेल्या 3 शेतकर्यांची हवाई दलाने हेलिकॉप्टरद्वारे सुटका केली. द्वारका येथे 12 तासांत 281 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आजही येथे मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. दुसरीकडे मध्यप्रदेशातही मुसळधार पाऊस सुरू आहे. सिवनी जिल्ह्यात रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने सोमवारी सायंकाळी दोन पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या.
COMMENTS