Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धोत्रे ग्रामपंचायतीचा ध्वजारोहण गुणवंत विद्यार्थिनी श्रावणीच्या हस्ते उत्साहात

Oplus_131072 कोपरगाव शहर ः सबंध देशभरात देशाचा 78 वा स्वातंत्र्य महोत्सव मोठ्या जल्लोषात गुरुवार 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जात असून त्याच अनुषंगाने

बेलापूरला महिला सरपंचांच्या हस्ते ध्वजारोहन      
स्वा.सावरकर उद्यानात अमृतवन परिवाराचे झेंडावंदन
कोल्हे व गणेशनगर कारखान्यावर विवेक कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहन
Oplus_131072

कोपरगाव शहर ः सबंध देशभरात देशाचा 78 वा स्वातंत्र्य महोत्सव मोठ्या जल्लोषात गुरुवार 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जात असून त्याच अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावचे सरपंच प्रदीप चव्हाण व त्यांच्या ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतीचा ध्वजारोहण करण्याचा मान गावातील श्री वीरभद्र विद्यालयातील इयत्ता दहावीच्या वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली श्रावणी पंडित शिंदे व तिच्या पालकांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या प्रसंगी धोत्रे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व आजी माजी सदस्य, ग्रामसेवक अविनाश पगारे, गावचे पोलिस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा व आरोग्य सेविका, श्री वीरभद्र विद्यालय धोत्रे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोत्रे तसेच अंजनी इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, कामगार तलाठी वाघ आदीसह गावातील शिक्षण प्रेमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी धोत्रे गावची गुणवंत विद्यार्थिनी श्रावणी व तिच्या आई-वडिलांचा ग्रामपंचायतीच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तर याविषयी सरपंच चव्हाण यांनी अधिक बोलताना सांगितले की, श्रावणीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत उच्चांकी गुण मिळवत संपूर्ण तालुक्यात गावचे नाव उज्वल करत परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे येणार्‍या प्रत्येक राष्ट्रीय उत्सवाचा ग्रामपंचायतीचा ध्वजारोहण गावातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते करण्याचे ठरले असून याची सुरुवात आजपासून गावातील गुणवंत श्रावणी शिंदे या विद्यार्थीनीच्या शुभहस्ते ध्वजारोहण करत संपन्न झाला असल्याची माहिती सरपंच चव्हाण यांनी देत सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

COMMENTS