नाशिक प्रतिनिधी - दरवर्षीप्रमाणे अमृत वन परिवाराच्या वतीने पेठ रोडवरील स्वा सावरकर उद्यानात ध्वजारोहण करण्यात आले. यावर्षी करन्सी नोट प्रेस मध
नाशिक प्रतिनिधी – दरवर्षीप्रमाणे अमृत वन परिवाराच्या वतीने पेठ रोडवरील स्वा सावरकर उद्यानात ध्वजारोहण करण्यात आले. यावर्षी करन्सी नोट प्रेस मधील निवृत्त कर्मचारी व वय ७८ उलटूनही व्यायामाचा सराव कायम ठेवणारे म्हसुजी शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याच उद्यानात एक सैनिक स्मारक व नाशिक जिल्ह्यातील क्रांतिकारकांच्या स्मृती जतन करण्यासाठी क्रांतीस्तंभ उभारण्याचा प्रयत्न माजी सैनिक परिवार व अमृत वन परिवाराच्या माध्यमातून सुरू आहे.याप्रसंगी अमृतवन परिवाराचे संयोजक ज्ञानेश्वर काकड,अंबादास शेलार, शिवाजी महानुभाव,बबन ढगे, स्वप्निल दाणी, विजय थेटे, गोकुळ पवार,विजय पिंगळे, अभिजीत पिंगळे, मनोज शिंदे, अनिल अहिरे, संदीप मिश्रा, निलेश गांगुर्डे, आबा तिडके तसेच अमृत वन हास्य क्लबच्या जयश्री गावित, सौ.सुनिता काकड,ज्योती वाघमारे,सौ.कांता अहिरे, आशा जाधव ,निर्मला निकम, सुनंदा कुमावत, कांता अहिरे, लीला सोमासे, राजलता दाणी, मीना बागुल, वैशाली गांगुर्डे ,सरला अहिरे, शुभांगी पाटील , मनीषा सानप,भारती कोठारे, कल्पना जगताप, माधुरी रनमाळे, अलका चौधरी, सोनाली भोजने यांच्यासह परीवाराचे सदस्य उपस्थित होते.
COMMENTS