Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

नाशिक - भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आल

कोल्हे व गणेशनगर कारखान्यावर विवेक कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहन
शारदा शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात
स्वा.सावरकर उद्यानात अमृतवन परिवाराचे झेंडावंदन

नाशिक – भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीदांना अभिवादन करून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.

 जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण प्रसंगी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, डॉ. शशिकांत मंगरुळे, शुभांगी भारदे आणि स्वाती थविल, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा कोषागार अधिकारी महेश बच्छाव, तहसिलदार मंजुषा घाटगे, अमोल निकम, आणि अमित पवार यांच्यासह माजी स्वातंत्र्य सैनिक, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

COMMENTS