Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बेलापूरला महिला सरपंचांच्या हस्ते ध्वजारोहन      

बेलापूर ः स्वातंत्र्य दिनानिमित्त बेलापूर येथे सरपंच स्वाती अमोलिक, सदस्या तबसुम बागवान, उज्वला कुताळ, प्रियांकीकुर्‍हे, मिना साळवी,शिला पोळ,सुशि

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न
शारदा शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात
धोत्रे ग्रामपंचायतीचा ध्वजारोहण गुणवंत विद्यार्थिनी श्रावणीच्या हस्ते उत्साहात

बेलापूर ः स्वातंत्र्य दिनानिमित्त बेलापूर येथे सरपंच स्वाती अमोलिक, सदस्या तबसुम बागवान, उज्वला कुताळ, प्रियांकीकुर्‍हे, मिना साळवी,शिला पोळ,सुशिला पवार, छाया निंबाळकर, रंजना बोरुडे व ज्योतीताई भांड या महिलांच्या हस्ते सार्वजनिक ध्वजवंदन सोहळा संपन्न झाला.                                            
या सोहळ्यास ग्रामस्थ, जे.टी.एस हायस्कूल, जिल्हा परिषद मुले व मुलींची शाळा, आहिल्यादेवी होळकर उर्दू शाळा यांचेकडे विद्यार्थी सहभागी झाले होते. यानिमित्त ध्वजगित, महाराष्ट्र गीत, समर गीत सादर करण्यात आले. यानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दाणी यांचे अध्यक्षतेखाली विलास कुर्‍हे व जिनाभाई शेख यांची समितीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ध्वजवंदनास जि.परिषद सदस्य शरद नवले, बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, उपसभापती अभिषेक खंडागळे, भरत साळुंके, रविन्द्र खटोड, चंद्रकांत नवले, राजेन्द्र सातभाई, जालिंदर कुर्‍हे, सुधाकर खंडागळे, हाजी इस्माईल शेख, भास्कर खंडागळे, सुहास शेलार, दिलीप दायमा, शफीक आतार, अ‍ॅड. विजय साळुंके, शिवाजी वाबळे, शेषराव पवार, सुभाष अमोलिक, सुरेश अमोलिक, लहानु नागले, पुरुषोत्तम भराटे, गोपी दाणी, असिफ बागवान, जनार्दन ओहोळ, गणेश बंगाळ, विशाल आंबेकर, विष्णुपंत डावरे, सुधीर तेलोरे, भाऊसहेब तेलोरे, विलास सोनवणे, अल्ताफभाई शेख, किशोर नवले, अशोक प्रधान, दिलिप दायमा, बाबुलाल पठाण, प्रकाश कुर्‍हे, यादव काळे, महेश कुर्‍हे, ग्रामविकास आधिकारी आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS