Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनी इंजिनिअरिंगच्या पाच विद्यार्थ्यांना नोकरी

कोपरगाव : संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाच विद्यार्थ्यांची नामांकित आयटी कंपनी ड्रिझल आयटी सर्विसेस मध्ये नोकरीसाठी निवड झाली. विशेष म्हणजे इंटर्नशिप

रस्ते आणि शिक्षण विकासाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू-आ.आशुतोष काळे 
सेवेतूनच खऱ्या अर्थाने संस्कार घडतात : कोल्हे
कोपरगावला दोन हजार टन युरिया पुरवणार 

कोपरगाव : संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या पाच विद्यार्थ्यांची नामांकित आयटी कंपनी ड्रिझल आयटी सर्विसेस मध्ये नोकरीसाठी निवड झाली. विशेष म्हणजे इंटर्नशिप कालावधीतच त्यांना पगार सुरू झाला आहे अशी  माहिती कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने विद्यार्थ्यांना उद्योगमान्य कौशल्यांचे प्रशिक्षण, मुलाखतींचा सराव, तांत्रिक मार्गदर्शन आणि सॉफ्ट स्किल्स विकास यांची प्रभावी तयारी करून घेतली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कॉम्प्युटर  इंजिनिअरिंगच्या तन्मय राजेंद्र आचारे, रामेश्वर  दिलीप भांड, आदित्य संजय लोंढे, प्रियंका वसंत मोहन व इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीच्या समीक्षा किशोर नरोडे यांचा समावेश आहे.

 संजीवनीचे अध्यक्ष नितिन कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन करून छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी डॉ. एम.व्ही. नागरहल्ली, डॉ. विशाल  तिडके, डॉ. माधुरी जावळे उपस्थित होते.

संजीवनीतील उत्कृष्ट प्लेसमेंटची माहिती आधीपासूनच असल्याने प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. महाविद्यालयात उद्योगविश्वाशी जोडणाऱ्या व नव्या तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळा सातत्याने होतात. ‘सेल्सफोर्स’ या एआय-आधारित कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट प्लॅटफॉर्मवरील कार्यशाळेत सहभागी झाल्याचा प्रत्यक्ष मुलाखतीत मोठा फायदा झाला. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने मुलाखत कौशल्य, प्रभावी संवाद, देहबोली आणि व्यावसायिक सादरीकरणाबाबत दिलेले मार्गदर्शन उपयुक्त ठरले. “या निवडीमुळे माझे तसेच माझ्या आई-वडिलांचे स्वप्न साकार झाले. या यशामागे महाविद्यालयाचे मार्गदर्शन, शिक्षकांचे पाठबळ आणि कुटुंबाचा विश्वास आहे.

–  समीक्षा नरोडे

COMMENTS