रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील खेडजवळ असलेल्या जगबुडी नदीच्या पुलावर सोमवारी पहाटेच्या सुमारास कार नदीत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. भरधा

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील खेडजवळ असलेल्या जगबुडी नदीच्या पुलावर सोमवारी पहाटेच्या सुमारास कार नदीत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगात असलेल्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार थेट नदीच्या 100 ते 150 फूट खोल पात्रात कोसळली. या भीषण दुर्घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील आई आणि दोन मुलांचा समावेश आहे.
ही कार विवेक श्रीराम मोरे यांच्या मालकीची असून, कारमधून मेघा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर, मिताली विवेक मोरे, निहार विवेक मोरे, श्रेयस राजेंद्र सावंत, विवेक श्रीराम मोरे, परमेश पराडकर या प्रवाशांपैकी मेघा पराडकर, सौरभ पराडकर, मिताली मोरे, निहार मोरे व श्रेयस सावंत यांचा मृत्यू झाला आहे. तर कारचा चालक विवेक मोरे व परमेश पराडकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
COMMENTS