Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणच्या विद्युत सुरक्षा अभियानाचे पाच नवीन विक्रम

  नाशिक /मुंबई : शून्य विद्युत अपघातासाठी जनजागृती अभियानातील विविध उपक्रमांत लोकसहभागाचे महावितरणने नवीन पाच विक्रम नोंदवून एशिया बुक ऑफ रेकॉ

मुंबईला मनोरंजन व पर्यटन क्षेत्राची राजधानी बनविणार ; नवीन २ लाख रोजगार संधी, ५० हजार कोटींची गुंतवणूक येणार
राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे एकत्रित नेटवर्क, संचलन व मॉनिटरिंग करण्याचा प्रस्ताव विचाराधीन : मंत्री प्रकाश आबिटकर
तोंडाची त्वचा काढून कृत्रिमरीत्या बसविली मूत्राशयाची नळी

 

Displaying MSEDCL Asia & India Book of Records 11-08-2025.JPG

नाशिक /मुंबई : शून्य विद्युत अपघातासाठी जनजागृती अभियानातील विविध उपक्रमांत लोकसहभागाचे महावितरणने नवीन पाच विक्रम नोंदवून एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान प्राप्त केले आहे. या दोन्ही संस्थांच्या वतीने सोमवारी (दि. ११) पाचही विक्रमाच्या नोंदीचे प्रमाणपत्र व सन्मानपदक प्रदान करून महावितरणचा गौरव करण्यात आला. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या संकल्पनेतून विद्युत सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानातील लोकसहभागाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतल्याबद्दल त्यांनी सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

COMMENTS