Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरे गटाचे पाच आमदार संपर्कात :उदय सांमतांचा गौप्यस्फोट

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असून, महाविकास आघाडीचा दारूण पराभव झालेला आहे. त्यामुळे ठाकरे गटातील पाच आमदार आमच्या संपर्कात

मुंबई मेट्रोच्या डब्यात पाणीगळती
गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा अपरिहार्यच!
ओबीसी घटक आणि मराठा आरक्षण ! 

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असून, महाविकास आघाडीचा दारूण पराभव झालेला आहे. त्यामुळे ठाकरे गटातील पाच आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते उदय सामंत यांनी केला आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचे निकाल लागले असून आता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे. या निवडणूकीत शिंदे गटाला देखील चांगले यश मिळाले आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे उदय सामंत यांनी शपथविधी अगोदर मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना उबाठाचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे. कोकणचा विकास आम्ही करू याचा आम्हाला विश्‍वास आहे. याशिवाय उबाठा जे आमदार निवडून आले आहेत ते आमच्या संपर्कात आहेत त्यातीलही काही आमदार आमच्याकडे येतील. याबाबत मुख्यमंत्री शिंदे साहेब योग्य तो निर्णय घेतील. ईव्हीएम मध्ये गडबड असल्याचा आरोप आता समोरून केला जात आहे. जो धनुष्यबाण दुसर्‍याच्या खांद्यावर होता तो आम्ही घेऊन आलो. गद्दारी कोणी केली हे पुन्हा एकदा दाखवून दिले, असेही सामंत म्हणालेत.

COMMENTS