पाच लाखाची खंडणी मागितली, पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाच लाखाची खंडणी मागितली, पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : गाळा खाली कर म्हणत 5 लाख रुपयाची खंडणी मागण्याची घटना नेवासा शहरात घडली. या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात पाचजणांवर गुन्हा दाखल कर

भविष्यात पुन्हा युती होईल का याचे काळच उत्तर देईल : रविंद्र बोरावके यांचे सूतोवाच
इंदुबाई बाबुराव बुरकुले यांचे निधन
शिवसेना चिन्हाबाबतचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा घातक –  बाळासाहेब थोरात

अहमदनगर/प्रतिनिधी : गाळा खाली कर म्हणत 5 लाख रुपयाची खंडणी मागण्याची घटना नेवासा शहरात घडली. या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी नेवासा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, हिरामण साहेबराव धोत्रे (वय 38रा. नेवासा खुर्द) यांनी नेवासा पोलिसात फिर्याद दिल्यावरुन संजू नाना सुखधान (रा. नेवासा खुर्द) व इतर 4 अनोळखी (नाव-गाव माहीत नाही)यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. नेवासा पंचायत समितीसमोर असलेल्या गाळ्यामध्ये धोत्रे हे झोपलेले असताना पाचजणांनी गाळ्याचे शटर वाजवून जबरदस्तीने गाळ्यामध्ये प्रवेश करून गाळा खाली करण्यास सांगून, खाली केला नाही तर सुखधान याला 5 लाख रुपये द्यावे लागतील नाहीतर दरमहा 10 हजार रुपयाची मागणी करुन खंडणीची मागणी केली व लाथाबुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस हवालदार चौधरी करीत आहेत.

COMMENTS