Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरात महिलांसाठी पाच दिवसीय योगा शिबीर

कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकार

संगमनेर ः धावपळीच्या जीवनात चांगल्या आरोग्यासाठी योगा हा अत्यंत महत्त्वाचा असून कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून  महिलांकरता 18

राहुरीत 11 सरपंचांसाठी 88 उमेदवारांचे गुडघ्याला बाशिंग !
नगरपरिषदेने फंडातून एच.आर. सिटी स्कॅनिंग मशीन त्वरीत खरेदी करावी ;उपनगराध्यक्ष, भाजप, शिवसेना नगरसेवकांची मागणी
हनुमान जयंतीनिमित्त आज महाप्रसादाचे आयोजन

संगमनेर ः धावपळीच्या जीवनात चांगल्या आरोग्यासाठी योगा हा अत्यंत महत्त्वाचा असून कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून  महिलांकरता 18 ते 22 जून या काळात भव्य योगा शिबिर होत असून शेकडो महिलांच्या उपस्थितीमध्ये या शिबिराचा मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला आहे. योगामुळे निरोगी जीवनाबरोबर उत्साह आणि ऊर्जा निर्माण होईल असा विश्‍वास डॉ. जयश्रीताई थोरात यांनी व्यक्त केला आहे.
मालपाणी लॉन्स येथे एकविरा फाउंडेशन व इन्फिनिटी योगा स्टुडिओ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय योगा शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी समवेत नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, सिंगापूर आलेल्या प्रशिक्षक मनीषा वामन, इन्फिनिटीचे संचालक रितेश सोनवणे, मुख्याधिकारी श्रीराम कुर्‍हे यांसह एकविराच्या विविध पदाधिकारी उपस्थित होत्या.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ जयश्रीताई थोरात यांनी सातत्याने महिला सबलीकरणासाठी व महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. या अंतर्गत 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन असून या निमित्ताने 18 ते 22 या कालावधीमध्ये सकाळी 7.30 ते 9 या वेळेत मोफत महिला योगा शिबिराचे आयोजन केले आहे. यामध्ये 21 जून रोजी पुरुषांसाठी योग शिबिर होणार असून 22 जून रोजी सर्वांसाठी एकत्रित मालपाणी लॉन्स येथील मोठ्या हॉलमध्ये योगा शिबिराचे आयोजन केले आहे. यावेळी बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, प्रत्येक जण धावपळी मध्ये व्यस्त असतो आणि तो आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु आरोग्य हे सर्वात महत्त्वाचे असून प्रत्येकाने स्वतःच्या आरोग्यासाठी थोडा वेळ काढला पाहिजे. योगातून काम करण्यासाठी प्रत्येकाला ऊर्जा आणि उत्साह मिळत असते. कुटुंबातील इतरांच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या महिलांकरता या योग शिबिरातून नक्कीच उत्साह आणि ऊर्जा मिळेल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या पाच दिवसीय योग शिबिरातून जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. सिंगापूर येथून आलेल्या प्रशिक्षक मनीषा वामन व इन्फिनिटी चे संचालक रितेश सोनवणे यांनी शिबिरात प्रशिक्षण देण्याबरोबर झुम्बा डान्सचे ही प्रशिक्षण दिले. यावेळी संगमनेर मधील विविध संघटनांच्या पदाधिकारी व महिला भगिनी, महाविद्यालयीन तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

21 जून रोजी पुरुषांसाठी तर 22 जून रोजी सर्वांसाठी योगा – 18 ते 22 जून 2024 या कालावधीमध्ये दररोज सकाळी 7.30 ते 9 या वेळेमध्ये महिलांकरता योग शिबीर होत असून 21 जून रोजी फक्त पुरुषांसाठी योग शिबिर असणार आहे. तर 22 जून रोजी सर्वांसाठी योग शिबिर होणार असल्याची माहिती डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे.

COMMENTS