Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जुनैरा मेहरिन व अलविरा फातेमा यांचा जीवनातील पहिला रोजा पूर्ण

बीड । प्रतिनिधीसध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून सर्वत्र भक्तीभाव, आनंद आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळत आहे. या पवित्र मह

आ. सुरेश धस यांना फेसबुक पोस्टद्वारे धमकी; कडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
Beed : तहसीलदार सचिन खाडे यांच्या हस्ते गणेश विसर्जन (Video)
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या क्रीडा संघात आदित्य कृषी महाविद्यालयाचा डंका

बीड । प्रतिनिधी
सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून सर्वत्र भक्तीभाव, आनंद आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळत आहे. या पवित्र महिन्यात रोजा (उपवास) ठेवणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे महिला, पुरुष, युवक-युवतींसह लहान मुले-मुली देखील उत्साहाने रोजे ठेवून नमाज अदा करत कुरआन पठणाद्वारे अल्लाहची इबादत करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर बीड येथील ड. रईस पठाण यांची पुतणी तथा इम्रान पठाण यांची कन्या जुनैरा मेहरिन (वय 9 वर्षे) आणि अलविरा फातेमा (वय 7 वर्षे) या दोन चिमुकल्यांनी मंगळवार, दि. 3 मार्च रोजी आपल्या जीवनातील पहिला रोजा पूर्ण करत धार्मिक कर्तव्य पार पाडले. दिवसभर संयम, श्रद्धा आणि उत्साहाने उपवास पूर्ण करून त्यांनी अल्लाहची इबादत केली. पहिल्या रोजाच्या निमित्ताने सायंकाळी सूर्यास्तानंतर मोमीनपुरा बायपास रोड येथील सिटी लॉन्स येथे इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन्ही चिमुकल्यांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. कुटुंबीय व नातेवाईकांनी त्यांच्या या धार्मिक जिद्दीचे कौतुक करत आनंद व्यक्त केला. या पवित्र प्रसंगी परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून जुनैरा मेहरिन व अलविरा फातेमा यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या प्रेरणादायी कृतीमुळे इतर मुलांनाही धार्मिक संस्कार व सद्गुणांची प्रेरणा मिळत आहे.

COMMENTS