Homeताज्या बातम्यादेश

महतारी वंदन योजनेचा पहिला हप्ता जारी

पंतप्रधान मोदी यांनी 70 लाख महिलांना 655 कोटी रुपयांचे वितरण

रायपूर/वृत्तसंस्था ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्षांकडून प्रचार करण्यावर भर देण्यात येत असून, छत्तीसगड सरकारच्या महत्त्वाकांक्षी

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे उपाय अवलंबवा
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का !
शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा शॉक लागून मृत्यू.

रायपूर/वृत्तसंस्था ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्षांकडून प्रचार करण्यावर भर देण्यात येत असून, छत्तीसगड सरकारच्या महत्त्वाकांक्षी महतरी वंदन योजनेचा पहिला हप्ता रविवारी जारी करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल 70 लाख महिलांच्या खात्यात एकूण 655 कोटी रुपये ट्रान्सफर केले.
कार्यक्रमाला व्हर्चुअली संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज मी काशीहून माझ्या माता-भगिनींच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत. आता कोणत्याही त्रासाशिवाय दर महिन्याला तुमच्या खात्यात पैसे येत राहतील, हा माझा छत्तीसगडच्या भाजप सरकारवर विश्‍वास आहे. मी गॅरंटी देतो. जेव्हा माता-भगिनी सशक्त होतात, तेव्हा संपूर्ण कुटुंब सशक्त होते. माता-भगिनींच्या कल्याणाला डबल इंजिन सरकारचे प्राधान्य आहे. रायपूरच्या सायन्स कॉलेज मैदानावर आयोजित मुख्य कार्यक्रमात मुख्यमंत्री विष्णुदेव साई, मंत्री लक्ष्मी राजवाडे, ब्रिजमोहन अग्रवाल, रामविचार नेताम यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. जय जोहारने आपल्या भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान म्हणाले की, दोन आठवड्यांपूर्वी मी छत्तीसगडमध्ये 35 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले होते. आज मला महिला शक्तीला सक्षम करणारी महतरी वंदन योजना समर्पित करण्याची संधी मिळाली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 70 लाखांहून अधिक माता-भगिनींना दरमहा एक हजार रुपये देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. भाजप सरकारने दिलेले आश्‍वासन पूर्ण केले आहे. बाबा विश्‍वनाथ तुम्हाला देखील आशीर्वाद देत आहेत. पंतप्रधान म्हणाले की आज योजनेअंतर्गत 655 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जारी करण्यात आला आहे. मी स्क्रीनवर पाहतोय की लाखो भगिनी दर्शन घेत आहेत. तुम्हा बहिणींना इतक्या मोठ्या संख्येने एकत्र पाहणे आणि तुमचे आशीर्वाद घेणे हे माझे भाग्य आहे. मी तुमच्यामध्ये छत्तीसगडमध्ये पोहोचायला हवे होते, पण वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळे मी यूपीमध्ये आहे. मी बाबा विश्‍वनाथांच्या नगरीत आहे. काशी शहरातून मला तुम्हा सर्वांशी बोलण्याची संधी मिळाली आहे. बाबा विश्‍वनाथ देखील तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. महाशिवरात्रीमुळे 8 मार्चला कार्यक्रम होऊ शकला नाही. भोलेनाथांच्या आशीर्वादाने तुमच्या खात्यावर 1000 रुपये पोहोचत आहेत.

COMMENTS