Homeताज्या बातम्यामनोरंजन

परिणीती चोप्रा यांच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेची पहिली झलक

मुंबई प्रतिनिधी - मनोरंजन क्षेत्रातील बॉलिवूड अभिनेत्री परिणीची चोप्रा लवकरच मिसेस चड्डा होणार आहे. चाहते त्यांच्या लग्नाची मोठ्या आतुरतेने

श्रम व ज्ञानशीलतेचा संदेश देणारी पुस्तके प्रत्येक घरात असावीत – सुभाष देशमुख
आमदार अपात्रतेच्या निकालासाठी सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ
ज्येष्ठ पत्रकार राम कुलकर्णी यांना राज्यस्तरीय आदर्श बंधू भरत पुरस्कार जाहीर

मुंबई प्रतिनिधी – मनोरंजन क्षेत्रातील बॉलिवूड अभिनेत्री परिणीची चोप्रा लवकरच मिसेस चड्डा होणार आहे. चाहते त्यांच्या लग्नाची मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. येत्या २३ आणि २४ सप्टेंबर दिवशी ते लग्नबंधनात अडकणार आहेत. सध्या त्यांच्या निमंत्रण पत्रिकेची पहिली झलक समोर आल्याने चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांचा १३ मे २०२३ दिवशी दिल्लीमधील कपूरथ हाऊसमध्ये मोठ्या थाटात साखरपुडा झाला. त्यांच्या साखरपुड्याला अनेक बॉलिवूडकरांसह अनेक राजकीय मंडळींनी हजेरी लावलायचे बघायला मिळालं होत. आता त्यांच्या लग्नाची चाहत्यांना खूप दिवसापासून प्रतीक्षा होती. राघव-परिणीती यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका पांढऱ्या रंगाची आहे. त्यावर त्यांनी मोठ्या अक्षरात, सोनारी रंगात, स्टायलिश आणि हटक्या अंदाजात परिणीती आणि राघव यांची नावे बघायला मिळत आहेत. तर या वेडिंग रिसेप्शन कार्डवर लिहिलेले आहे की,”राघव चड्ढा यांचे आई-वडील अलका आणि सुनील चड्ढा यांच्यावतीने तुम्हाला ३० सप्टेंबर २०२३ दिवशी पंजाब मधील ताज येथील चंडीगढ येथे राघव आणि परिणीती यांच्या रिसेप्शनसाठी निमंत्रित करत आहोत”. २४ सप्टेंबर दिवशी राघव-परिणीतीचा शाही विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे. तसेच उदयपूरमधील आलिशान हॉटेलमध्ये लग्नाच्या विधींकरिता बुकींग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांच्या साखरपुड्याची बातमी समोर आल्यापासूनच चाहत्यांना आता त्यांच्या लग्नाची चांगलीच आतुरता लागली आहे.मिळालेल्या माहितीनुसार या दोघांच्या लग्नाचे अनेक वेगवेगळे कार्यक्रम आणि विधी २३ आणि २४ सप्टेंबर या दिवशी पार पडणार आहेत. याकरिता उदयपूरमधील शानदार हॉटेल लीला पॅलेस बुकींग करण्यात आले आहे.

COMMENTS