Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगर मध्ये भर रस्त्यात गोळीबार

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण

सरकार नव्हे, आमदारच प्रशासनाच्या दारी
भाग्यश्री पेपर व जायंटस प्राइड तर्फे भव्य सामूहिक विवाह
संभाजी नगर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी आहेत. चाऊस हमद असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. पैशाच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. न्यू बायजीपूरा परिसरात हा हल्ला करण्यात आला. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे. संभाजीनगरमध्ये भर रस्त्यावर चार राऊंड फायर करण्यात आले. पैशाच्या वादातून हा गोळीबार झाला आहे. एकाला मारण्याच्या उद्देशाने हा गोळीबार केला गेला, पण दुसरा जवळ असल्यामुळे तोही जखमी झाला. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण डॉक्टरांनी यातल्या एकाला मृत घोषित केलं. याआधी मागच्याच आठवड्यात संभाजीनगरच्या पुंडलिकनगरमध्ये गोळीबार झाला होता. मनपा कर्मचाऱ्यावर गोळीबार करणारा स्वत:चाच मुलगा निघाला होता. पुंडलिकनगरमध्ये मनपा कर्मचाऱ्यावर घरात घुसून गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी यातील आरोपीला अटक केली. अटकेनंतर धक्कादायक माहिती समोर आली. गोळीबार करणारा दुसरा-तिसरा कोणी नसून मनपा कर्मचाऱ्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा होता. त्याने मित्राच्या मदतीने गोळीबार केला. भावाला मनपातील नोकरी न देता तिसऱ्या पत्नीच्या पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाला नोकरी देत असल्याचा राग मनात धरून हा गोळीबार करण्यात आल्याची आरोपीने कबुली दिली.

COMMENTS