पुणे ः दोन वर्षापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन पूर्ववैमनस्यातून 15 वर्षीय सराईत गुन्हेगार अल्पवयीन मुलावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्

पुणे ः दोन वर्षापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन पूर्ववैमनस्यातून 15 वर्षीय सराईत गुन्हेगार अल्पवयीन मुलावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता भागातील अभिरुची मॉल परिसरात घडली आहे. याप्रकरणी 16 वर्षीय सराईत गुन्हेगार अल्पवयीन मुलासह दोन 15 ते 16 वयोगटातील साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडित 15 वर्षीय मुलाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात आरोपी विंरोधात फिर्याद दिली आहे.
COMMENTS