Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इंदापूर तालुक्यात निवडणुकीनंतर गोळीबार

इंदापूर : ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने इंदापूर तालुक्यातील काझडमध्ये हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांविरो

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान
संविधानाच्या उद्देशिकेतील मूल्यांचा अंगीकार व्हावा- मुख्यमंत्री फडणवीस
लातूरची एसटी सुसाट; ’मे’ महिन्यात 2 कोटींचा नफा !

इंदापूर : ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याने इंदापूर तालुक्यातील काझडमध्ये हवेत गोळीबार केल्याची घटना घडली. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती वालचंदनगर पोलीसांनी दिली. सोमवारी इंदापूर तालुक्यातील काझड मध्ये काझड-अकोले रोडवर अकोले चौकात ही घटना घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याच्या कारणातून गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करून हवेत गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी गणेश शिवदास काटकर यांच्या फिर्यादीवरुन काझड मधील राहुल चांगदेव नरुटे आणि समीर मल्हारी नरुटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS