Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थंडीचा कडाका वाढल्याने ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या

कुडाळ / वार्ताहर : वातावरणीय बदलाने दिवसेंदिवस हवामान बदलत आहे याचा ऋतुमानावर परिणाम झाला आहे. हिवाळा सुरू असून गेली आठ दिवसांपासून गायब झालेल्

महाबळेश्‍वर येथील पर्यटन विकास कामांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून आढावा
सातारा जिल्ह्यात ओमिक्रॉनचे तीन रुग्ण; युगांडामधून फलटणमध्ये आलेल्या चौघापैकी तिघे बाधित
कोरेगावमध्ये दोन दुकाने खाक; साडेतीन लाखांचे नुकसान

कुडाळ / वार्ताहर : वातावरणीय बदलाने दिवसेंदिवस हवामान बदलत आहे याचा ऋतुमानावर परिणाम झाला आहे. हिवाळा सुरू असून गेली आठ दिवसांपासून गायब झालेल्या गुलाबी थंडीला गुरुवारपासून पुन्हा सुरूवात झाली. ग्रामीण भागात हुडहुडी भरली आहे. थंडीचा कडाका वाढला असून परिसरात गारठा कायम आहे. थंडी जाणवू लागली असल्याने ग्रामीण भागात जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
पहाटेच्यावेळी आणि रात्री शेकोट्या पेटवुन थंडीपासून बचाव केला जात आहे. सायंकाळनंतर थंडीच्या प्रमाणात वाढ होत आहे. लोक सायंकाळी बाहेर पडणे टाळत आहेत. लहान बालक व वृध्द नागरिकांना थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सकाळी अन संध्याकाळी कानटोप्या, मफलर, स्वेटर घालून लोक फिरायला जात आहेत. दिवसाही थंडी जाणवत आहे. बदलत्या वातावरणामुळे आशा परिस्थितीचा अनुभव येत आहे.
यावर्षी ऑक्टोंबरपर्यंत पाऊस सुरु असल्याने नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापासून थंडीला सुरूवात झाली. राज्यातील अनेक भागात सुरुवातीला थंडीचा जोर होता. मात्र, काही काळ गायब झालेली थंडी पुन्हा झोंबू लागली आहे. गुरुवार पहाटेपासून चांगलीच थंडी पडत असून हवेतही गारठा वाढला आहे. तापमानाचा पारा कमी होतासून सकाळी अन संध्याकाळी थंडी जाणवायला लागली आहे.

COMMENTS