Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चीनमधून आणलेले 11 कोटींचे फटाके जप्त

मुंबई ः न्हावा शेवा येथे सीमाशुल्क विभागाने चीनमधून 11 कोटींचे फटाके जप्त केले आहे.  मॉप रॉड आणि ब्रश क्लीनर’ असल्याचं भासवून प्रतिबंधित फटाक्यां

छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हे, स्वराज्यरक्षक
वरळी सी लिंकवरील अपघातात तिघांचा मृत्यू
कसब्यात 45 तर, चिंचवडमध्ये 41 टक्के मतदान

मुंबई ः न्हावा शेवा येथे सीमाशुल्क विभागाने चीनमधून 11 कोटींचे फटाके जप्त केले आहे.  मॉप रॉड आणि ब्रश क्लीनर’ असल्याचं भासवून प्रतिबंधित फटाक्यांची तस्करी करणार्‍या दोन कंटेनर जप्त करण्यात आले आहेत.सीमाशुल्क विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली आहे. यामध्ये तब्बल 11 कोटी रुपयांचे 40 मेट्रिक टन प्रतिबंधित चिनी फटाके जप्त करण्यात आले आहेत. सीमाशुल्क नियमांनुसार, फटाक्यांची आयात करण्यावर बंदी आहे. फटाके आयात करण्यासाठी डायरेक्टोरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेडकडून परवानगी घ्यावी लागते. रेड लीड आणि लिथियम सारख्या विषारी रसायनांसह निकृष्ट दर्जाच्या विदेशी फटाक्यांचा ओघ रोखण्यासाठी हा परवाना आवश्यक करण्यात आला आहे.

COMMENTS