Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी परिसरात आग

मुंबई ः नवी मुंबईच्या तुर्भे एमआयडीसी परिसरात असलेल्या एका फर्निचर बनवणार्‍या कारखान्याला मंगळवारी (ता.27) दुपारी 12 वाजेच्या सुमारास अचानक आग ला

वाढती बंडखोरी ठरणार डोकेदुखी
महाविकास आघाडीची आजपासून जागा वाटपावर बैठक
नात्याला काळिमा…भावजयीवर अत्याचार, गुन्हा दाखल

मुंबई ः नवी मुंबईच्या तुर्भे एमआयडीसी परिसरात असलेल्या एका फर्निचर बनवणार्‍या कारखान्याला मंगळवारी (ता.27) दुपारी 12 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आग लागल्याचे कळताच कारखान्यातील कामगारांनी बाहेर धाव घेतली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 4 बंब घटनास्थळी दाखल झाले. कारखान्यात लाकडी सामान असल्याने मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

COMMENTS