हिंगोली : हिंगोली येथील पोस्ट ऑफीस रोड भागातील युनीयन बँकेला शुक्रवारी सकाळी सात वाजता आग लागली होती. मात्र पालिकेच्या सतर्कतेने आग वेळीच आटोक्या

हिंगोली : हिंगोली येथील पोस्ट ऑफीस रोड भागातील युनीयन बँकेला शुक्रवारी सकाळी सात वाजता आग लागली होती. मात्र पालिकेच्या सतर्कतेने आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र बँकेतील यंत्र जळाल्याने आता बँक कधी सुरू होणार असा प्रश्न निर्माण झाला असून बँकेच्या स्थलांतराचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. हिंगोली येथील पोस्ट ऑफीस रोड भागात युनीयन बँकेची शाखा आहे. मागील पंधरा वर्षापासून बँक या ठिकाणी आहे. आज सकाळी सात वाजता बँकेच्या खिडक्यांमधून धुर निघू लागला होता. त्यामुळे बँकेला आग लागल्याचे लक्षात येताच नागरीकांनी तातडीने बँकेचे व्यवस्थापक रमेश राठोड यांना माहिती दिली तसेच पालिकेलाही माहिती देण्यात आली.
COMMENTS