Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईतील बीकेसी मेट्रो स्थानकात आग

मुंबई : मुंबई मेट्रो 3 मार्गावरील बीकेसी स्थानकावर शुक्रवारी आग लागल्याने मेट्रो सेवा ठप्प झाली. मेट्रो 3 मार्गावर अपघाताची ही दुसरी घटना आहे. या

बार्टी, सारथीच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा लाँग मार्च
एअर इंडियाची ‘घर वापसी’ ?
बिहारमध्ये 4.3 तीव्रतेचा भूकंप

मुंबई : मुंबई मेट्रो 3 मार्गावरील बीकेसी स्थानकावर शुक्रवारी आग लागल्याने मेट्रो सेवा ठप्प झाली. मेट्रो 3 मार्गावर अपघाताची ही दुसरी घटना आहे. याआधी शनिवारी तांत्रिक बिघाडामुळे सुमारे तासभर प्रवाशांना अंडरग्राउंड स्थानकात अडकून पडावे लागले होते. बीकेसी स्थानकात एन्ट्री-एक्झिट ए-4 च्या बाहेर ही आग लागली. आगीनंतर उठलेले धुराचे लोट स्थानकात शिरल्याने मेट्रोची प्रवासी सेवा तात्पुरती खंडित करण्यात आली आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून सर्वकाही सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

COMMENTS