Homeताज्या बातम्यादेश

पर्‍हाटी जाळल्यास 5 ते 30 हजारापर्यंत दंड

नवी दिल्ली : हरियाणा आणि पंजाब या राज्यातून पर्‍हाटी जाळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून, त्यामुळे राजधानी दिल्लीत प्रदूषण मोठ्या प्रमाणावर

’श्रीराम’ चे थकीत पाच कोटी कामगारांच्या खात्यावर : ना. रामराजे
तब्बल अठरा तासानंतर सांगली बाजार समिती परिसरातील गवा पकडला
दूध उत्पादकांना प्रति लिटर 50 पैसे रिबेट व भेटवस्तू ; राहात्यातील पंचकृष्णा डेअरीने केली दिवाळी गोड

नवी दिल्ली : हरियाणा आणि पंजाब या राज्यातून पर्‍हाटी जाळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असून, त्यामुळे राजधानी दिल्लीत प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी उपाययोजना करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने गुरूवारी अधिसूचना जारी करत पर्‍हाटी जाळणार्‍या शेतकर्‍यांचा दंड दुप्पट केला आहे.
पर्यावरण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आता 2 एकरपेक्षा कमी जमिनीवर 5000 रुपये दंड आकारला जाणार आहे. दोन ते पाच एकर जमीन असणार्‍यांना 10 हजार रुपये आणि पाच एकरांपेक्षा जास्त जमीन असणार्‍यांना 30 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

COMMENTS