Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संचालकांनी पारदर्शक कारभार केल्याने आर्थिक सुबत्ता : आमदार मोनिका राजळे

पाथर्डी ः अवघ्या दहा महिन्यात एक कोट 35 लाख रुपयांचे उत्पन्न घेत बाजार समितीच्या पदाधिकारी व संचालकांनी उत्तुंग झेप घेत शेतकरी व व्यापारी हित जपण

व्यावसायिक शिक्षण काळाची गरज ः आमदार मोनिका राजळे
स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या विचारधारेवरच वाटचाल सुरु – आमदार मोनिका राजळे
पत्रकारांनी चांगल्या वाईट गोष्टी मांडण्याचे धाडस करावे -आमदार मोनिका राजळे

पाथर्डी ः अवघ्या दहा महिन्यात एक कोट 35 लाख रुपयांचे उत्पन्न घेत बाजार समितीच्या पदाधिकारी व संचालकांनी उत्तुंग झेप घेत शेतकरी व व्यापारी हित जपण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले. बाजार समितीच्या नवीन भुईकाटा उदघाटन व कांदा शेड कामाच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या.
या वेळी भाजप तालुकाध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, बाजार समिती अध्यक्ष सुभाष बर्डे, उपाध्यक्ष कुंडलिक आव्हाड,माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, नंदकुमार शेळके, संचालक शेषराव कचरे, अजय रक्ताटे, नारायण पालवे, पांडुरंग लाड, वैभव खलाटे, शुभम गाडे,प्रशांत मंडलेचा, संजय बडे, विष्णुपंत अकोलकर, माणिक खेडकर, रामकिसन काकडे, अमोल गर्जे, नितीन गर्जे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संदीप पठाडे,समितीचे सचिव बाळासाहेब बोरुडे हे उपस्थित होते. या वेळी अद्यावत काटा बसवल्या बद्दल व्यापारी व हमाल संघटनेने राजळे व समितीच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार केला. पुढे बोलताना राजळे म्हणाल्या की,विद्यमान संचालकांनी काटकसरीने व पारदर्शक कारभार केल्याने आज समिती मध्ये आर्थिक सुबत्ता दिसून येत असून भविष्यात पनण महासंघ व राज्यशासनाच्या मदतीने या ठिकाणी शेतकरी निवास उभारले जाणार आहे.कांदा मार्केट सुरु करावे अशी कांदा उत्पादकांची मागणी होती ती पूर्ण होत असल्याचा आनंद आहे.अधिक क्षमतेचा वजनकाटा बसवून समितीने व्यापार्‍यांची मोठी सोय केली आहे. व्यापारी गाळे, भूखंड म्हणजेच बाजार समिती असा मर्यादित अर्थ न काढता व्यापार्‍यांना व शेतकर्‍यांना अधिक सुविधा देण्याचे काम केल्यास शेतकर्‍यांना व व्यापार्‍यांना आपला माल याच ठिकाणी विकणे सोपे जाणार आहे.खरेदी विक्री संघाचे व्यापारी संकुल लवकरच सुरु होऊन त्याचा व्यापार्‍यांना मोठा फायदा होणार असल्याचे शेवटी राजळे म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष बर्डे सूत्रसंचालन राजू सुरवसे तर आभार पांडुरंग लाड यांनी मानले.

COMMENTS