राहुरी प्रतिनिधी ः ज्या वित्तीय संस्थांनी आर्थिक शिस्त पाळली त्या संस्था यशस्वी झाल्या आहेत. आर्थिक शिस्त खूप महत्त्वाची असल्याने त्यात कोणतीही
राहुरी प्रतिनिधी ः ज्या वित्तीय संस्थांनी आर्थिक शिस्त पाळली त्या संस्था यशस्वी झाल्या आहेत. आर्थिक शिस्त खूप महत्त्वाची असल्याने त्यात कोणतीही तडजोड नसावी असे स्पष्ट मत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी व्यक्त केले. प्रेरणा ग्रामीण पतसंस्था व प्रेरणा मल्टीस्टेट या संस्थेने व्यवहारासाठी विविध पर्याय उपलब्ध करून दिलेल्या योजनेचे उद्घाटन तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
गुहा सारख्या ग्रामीण भागात पतसंस्था स्थापन करून शेतकरी व्यापारी व बेरोजगारांना कर्ज देऊन मोठी झेप घेतली स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले त्यामुळे सर्वसामान्यांना कर्ज मिळू लागले पतसंस्थांनीही ग्रामीण भागात संस्था काढून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. आज झपाट्याने जग बदलत आहे. टेक्नॉलॉजी आत्मसात करून संस्थेसह अनेकांची भरभराट होईल. रोजगाराची निर्मिती पतसंस्थांनी केली, ही चळवळ अधिक जोमाने वाढण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुरेश वाबळे, काकासाहेब कोयटे, शिवाप्पा कपाळे यासह पतसंस्था चालकांनी अथक प्रयत्न चालवले आहेत. ठेवीदार कर्जदार यांची सांगड घालून पतसंस्था चालविल्या जातात. ग्रामीण भागात पतसंस्था स्थापन करण्याचे धाडस वाबळे यांनी केले होते. त्या माध्यमातून त्यांनी अनेकांना संधी निर्माण करून दिली. आज प्रेरणा पतसंस्थेचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. यास आर्थिक शिस्त व संचालक मंडळातील एकमत महत्वाचे ठरले आहे. स्पर्धेच्या युगात काळाबरोबर बदलावे लागते व्यापारी ग्राहकांना घरबसल्या सुविधा निर्माण झाल्याने वेळेची मोठी बचत झाली असून, वेळेचे नियोजनास अनन्य साधारण महत्व असल्याने त्याचा अंगीकार करावा असे तनपुरे यांनी स्पष्ट केले.
पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे म्हणाले की आम्ही काळानुसार बदलत चालल्याने संस्था प्रगती करू लागल्या आगामी काळात मनुष्यविरहित संस्था राहतील इतक्या योजना यात आलेल्या आहेत प्रेरणा पतसंस्था व मल्टी स्टेटमेंट ठेवीदार व ग्राहकांचा विश्वास संपादन केल्याने कोट्यावधी रुपयांच्या ठेवी वाढले आहे शाखांचा विस्तारही करावा लागला पुण्यासारख्या ठिकाणी शाखा उघडाव्या लागल्या. गोवा येथील पणजी व मडगाव या ठिकाणी मल्टीस्टेटची शाखा उघडण्याचे नियोजन करण्यात आले आहे असे सांगून त्यांनी संस्थेच्या कार्यप्रणालीचा आढावा सांगितला व्यावसायिक ग्राहकांना नवीन कार्यप्रणाली व क्यू आर कोड उपलब्ध करून दिल्याने व्यापार्यांना अधिक सुलभता आल्याचे त्यांनी नमूद केले. प्रेरणा पतसंस्थेची वार्षिक उलाढाल सहाशे चार कोटी रुपयांवर तर प्रेरणा मल्टीस्टेटची 505 कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचे सांगितले. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष विष्णुपंत वर्पे, मच्छिंद्र हुरुळे, प्रा. वेणूनाथ लांबे, अशोक ऊर्हे, वसंत कोळसे, किशोर गागरे, सुजित वाबळे, लेखा परीक्षक सुरेश गोरे या संस्थेचे अधिकारी कर्मचारी व्यापारी उपस्थित होते.
COMMENTS