अखेर राजद्रोहाचे कलम स्थगित

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर राजद्रोहाचे कलम स्थगित

कलम 124 अ अंतर्गत गुन्हा दाखल न करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली/प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षांपासून राजद्रोहाचे कलम 124- अ वर अनेक वाद-विवाद झडत असतांना, हे कलम रद्द करण्याची मागणी सातत्याने केली जात हो

टेंपो-रिक्षा अपघातात दोन विद्यार्थिनी जागीच ठार.
राहाता तालुक्यातील गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल  
ठाण्यात लिफ्ट कोसळून 7 कामगारांचा मृत्यू

नवी दिल्ली/प्रतिनिधी : गेल्या अनेक वर्षांपासून राजद्रोहाचे कलम 124- अ वर अनेक वाद-विवाद झडत असतांना, हे कलम रद्द करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. कारण राजद्रोहाचा कायदा ब्रिटिशांनी 1860 मध्ये तयार केला असून, हा कालबाह्य कायदा असल्याचे मत अनेक तज्ज्ञांचे होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने राजद्रोह कायद्याचे कलम तात्पुरते स्थगित केले आहे.
या कायद्याच्या फेरविचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या कायद्यासंदर्भात फेरविचार करण्यासाठी केंद्र सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची दखल घेत न्यायालयाने हे कलम तात्पुरतक स्थगित केले आहे. भारतीय दंड विधानातील कलम 124 (अ ) अर्थात राजद्रोहाच्या कायद्यामधील हे कमल ‘कालबाह्य’ करण्यासंदर्भात सोमवारी, 9 मे रोजी फेरविचार करण्याची तयारी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रथमच दाखविली होती. त्यानंतर आता न्यायालयाने केंद्र सरकारला यासाठी परवानगी दिली आहे. हा फेरविचार पूर्ण होईपर्यंत या कलमाअंतर्गत कोणताही गुन्हा दाखल केला जाऊ नये असे न्यायालयाने स्पष्ट केले.
राजद्रोह कायद्याच्या फेरविचारापर्यंत प्रलंबित प्रकरणांचे काय करणार, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला दिले होते. राजद्रोह कायद्याचा फेरविचार करण्याच्या केंद्राच्या प्रतिज्ञापत्राची दखल घेत सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मंगळवारी या कायद्याबाबत अधिक स्पष्टीकरण मागितले होते. या कायद्याखाली दाखल असलेल्या प्रलंबित प्रकरणांचे काय करणार आणि कायद्याचा फेरविचार होईपर्यंत या कायद्याखाली नवे गुन्हे दाखल करणार नाहीत का असे प्रश्‍न न्यायालयाने विचारले होते. त्यावर सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारचे मत विचारात घेऊन याबाबत बुधवारी भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट करत बुधवारी आपली भूमिका न्यायालयासमोर मांडून कलमासंदर्भात फेरविचार करण्यासाठी कालावधी देण्यात यावा अशी मागणी केली. न्यायालयाने ही मागणी मंजूर केली आहे. मात्र त्याचवेळेस केंद्र तसेच राज्य सरकारने या कलमाअंतर्गत फेरविचार प्रतिक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत गुन्हे दाखल करु नये असे आदेश दिलेत. अवघ्या सहा दिवसांपूर्वी – पाच मे रोजी – या कलमाचे केंद्र सरकारच्या वतीने अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी समर्थन केले होते आणि ‘या कायद्याची घटनात्मक वैधता तपासावी’ अशी याचिका फेटाळून लावण्याची विनंती देशाच्या अ‍ॅटर्नी जनरल यांनी न्यायालयाला केली होती. दुसरीकडे, भीमा-कोरेगाव चौकशी आयोगासमोर मे 2022 च्या सुरुवातीस साक्ष देताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘या कलमाचा गैरवापर थांबवायला हवा, हा कायदा रद्दच केला पाहिजे’ असे मत व्यक्त केले होते.

राजद्रोह कायदा काय आहे ?
इंग्रजांनी तयार केलेल्या इंडियन पिनल कोडमध्ये हा कायदा 1870 मध्ये ब्रिटिशांनी आणला होता. कायद्याने स्थापन झालेल्या शासनाचे संरक्षण करण्यासाठी हा कायदा आणला गेला. यात देशाविरोधात आणि शासनाविरोधात असंविधानिक कृत्य केल्यास त्या व्यक्तीवर राजद्रोहाचा खटला दाखल होतो. मात्र हा कायदा इंग्रजांनी स्वातंत्र्यापूर्वी आणलेला आहे. भारतीय दंड विधान संहितेचे कलम 124 अ नुसार राजद्रोहा’ची व्याख्या करताना असे म्हटले आहे की, तोंडी अथवा लिखित शब्दात, चिन्हे, तोंडी अथवा अन्य प्रकारे भारतात कायद्याने स्थापित सरकारच्या विरोधात द्वेष, अवमानजनक अथवा असंतोष पसरवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे राजद्रोह होय. पण यातही विरोधाभास आहे. अभिव्यकी स्वातंत्र्याच्या संकल्पनेनुसार सरकार विरोधात बोलणे म्हणजे राजद्रोह नव्हे.

COMMENTS