Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर मुंबईमध्ये पावसाला सुरूवात

पुढील 3 दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. मात्र राज्यात मंगळवारपासून जोरदार पावसाने सु

साऊ एकल महिला समितीची अकोल्यात स्थापना
चौदा बालकांची विक्री करणार्‍या टोळी जेरबंद
शिक्षक बँकेच्या निवडणुकीने दिले सव्वा लाखाचे उत्पन्न ; साडेआठशेवर उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. मात्र राज्यात मंगळवारपासून जोरदार पावसाने सुरूवात झाल्यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबईत पुन्हा पुनरागमन केले असून, मंगळवारी सकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे वाढत्या उकड्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्‍चिम उपनगरात पाऊस झाल्याने मुंबईकर सुखावले आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस मुंबईत पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यात चांगलीच ओढ दिली होती. हवामान विभागाने 17 ऑगस्टपासून राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला होता, मात्र पावसाने देखील हवामान विभागाला हुलकावणी दिली होती. अखेर मंगळवार 22 ऑगस्टपासून पावसाला सुरूवात झाली. जोरदार पावसामुळे मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले होते. तर सकाळी पावसामुळे वाहतूक संथ गतीने पुढे जात होती. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण गोवा, पश्‍चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. तर मध्य महाराष्ट्र विदर्भात बर्‍याच ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भात काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. 22 ते 25 ऑगस्ट मध्ये कोकणात बहुतांश ठिकाणी मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. असे असले तरी राज्याच्या बहुतांश भागात पावसाने दडी मारली आहे. मोसमी पावसाचा आस हा उत्तरेकडे सरकला आहे. परिणामी राज्यावर कुठलीही यंत्रांना कार्यान्वित नाही. यामुळे पुढील 3 दिवसांत राज्यात पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. दरम्यान पाऊस नसल्याने पिकांना याचा फटका बसणार आहे. यामुळे बळिराजाची चिंता वाढली आहे.

COMMENTS