नवी दिल्ली/प्रतिनिधी ः केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी रेअर डिसील पॉलिसी-2021 अंतर्गत लिस्टेड सर्वच दुर्मिळ आजारांवरील उपचारांसाठी आयात करण्यात य

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी रेअर डिसील पॉलिसी-2021 अंतर्गत लिस्टेड सर्वच दुर्मिळ आजारांवरील उपचारांसाठी आयात करण्यात येणार्या औषधांसह स्पेशल फूडवरील बेसिक कस्टम ड्युटी रद्द केल्यामुळे दुर्मिळ आजारांनी त्रस्त असणार्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्राने कॅन्सरच्या उपचारात वापरल्या जाणार्या पेम्ब्रोलिझुमॅबवरही (कीट्रूडा) सूट दिली आहे. येत्या 1 एप्रिलपासून आयात शुल्कातील सवलत लागू होणार आहे. औषधांवर सामान्यतः 10% बेसिक कस्टम ड्यूटी आकारली जाते. तर जीवन-रक्षक औषधांच्या काही श्रेणींमध्ये 5 ते 0 टक्केचा कन्सेशनल रेट लावला जातो. स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी किंवा ड्यूचेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफीच्या उपचारात वापरल्या जाणार्या औषधांवर यापूर्वीच सूट देण्यात आली आहे. सरकारकडे अन्य दुर्मिळ आजारांच्या उपचारात वापरल्या जाणार्या औषधांवर सूट देण्याची मागणी केली जात होती. या आजारांवरील उपचारात वापरण्यात येणारी औषधी किंवा स्पेशल फूड अत्यंत महाग असतात. ते आयात करावे लागते. मंत्रालयाने सांगितले की, 10 किलो वजनी मुलाच्या काही गंभीर आजारांवरील उपचारांचा वार्षिक खर्च 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत असण्याचा अंदाज आहे. हे औषधोपचार आयुष्यभर करावे लागतात. ही सूट मिळवण्यासाठी वैयक्तिक आयातदाराला केंद्र किंवा राज्य संचालक आरोग्य सेवा अथवा जिल्हा वैद्यकीय अधिकारी/सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
COMMENTS