Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर सूर्यकांता पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

मुंबई ः माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती, त्यामुळे ऐन विधानसभा निवडणूक जवळ आली असतांना भाजपला धक्के बसतांना

जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार, 4 जणांचा जागीच मृत्यू
रिक्षात ओढून महिला पोलिसाचा विनयभंग | LokNews24
शैक्षणिक संस्थांनी कौशल्य आधारीत अभ्यासक्रम तयार करावे ः डॉ. पराग काळकर

मुंबई ः माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती, त्यामुळे ऐन विधानसभा निवडणूक जवळ आली असतांना भाजपला धक्के बसतांना दिसून येत आहे. मात्र सूर्यकांता पाटील नेमक्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहेत, याचे उत्तर अनुत्तरित होते, मात्र मंगळवारी त्यांनी खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पक्षात घेऊन महाविकास आघाडीला धक्का देणार्‍या भाजपलाच जोरदार झटका मिळाला आहे.
सूर्यकांता पाटील यांचा नांदेड व हिंगोलीसह लगतच्या मतदार संघांवर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे या भागातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ताकदीत मोठी वाढ होणार आहे. सूर्यकांता पाटील यांनी 2014 मध्ये भाजपत प्रवेश केला होता. पण त्यांचे मन भाजपमध्ये रमले नाही. त्या भाजपच्या स्थानिक पातळीवरील राजकारणाला कंटाळल्या होत्या. त्यांनी भाजपच्या कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवले होते. यामुळे त्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती. सूर्यकांत पाटलांनी 2 दिवसांपूर्वी भाजपचा राजीनामा दिला होता. त्यात त्यांनी भाजपमध्ये असताना खूप काही शिकण्यास मिळाल्याची भावना व्यक्त केली होती. त्या आपल्या राजीनामा पत्रात म्हणाल्या होत्या की, मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा तथा माझ्या हदगाव विधानसभा संयोजक पदाचा राजीनामा देत आहे. आपल्या सोबत गेल्या 10 वर्षांत खूप काही शिकता आले. तालुक्यात बुथ कमिटीपर्यंत काम केले. आपण दिलेल्या संधीसाठी मी आपली व भारतीय जनता पार्टीची अत्यंत आभारी आहे. मी आपला निरोप घेत आहे. अखेर 2 दिवसांपूर्वी त्यांनी भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन आपल्या पुढील राजकारणाचे संकेत दिले. त्यानुसार त्यांनी सोमवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. सूर्यकांता पाटलांनी चारवेळा खासदार व एकदा आमदार म्हणून हिंगोली व नांदेड मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यांनी केंद्रात ग्रामविकास राज्यमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. एवढेच नाही तर त्यांनी संसदीय कामकाज राज्यमंत्री म्हणूनही काम केले आहे.

सूर्यकांता पाटलांची विचारधारा मुळातच गांधी-नेहरूंची ः शरद पवार – माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी मंगळवारी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, सूर्यकांता पाटलांची विचारधारा मुळातच गांधी नेहरूंची आहे. त्यांनी एक महत्त्वाचा राजकीय निर्णय घेतला असून, मी त्यांचे स्वागत करतो. सूर्यकांताताई स्वातंत्र्य लढ्यातील कुटुंबातील आहेत. त्यांना केंद्रात काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांचा संसदीय कामकाजाचा सहभाग महत्त्वाचा टप्पा आहे. त्यांनी अतिशय योग्यवेळी आमच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.

COMMENTS