अखेर संजय राऊत यांना अटक; पत्राचाळ घोटाळयात ईडीची कारवाई

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर संजय राऊत यांना अटक; पत्राचाळ घोटाळयात ईडीची कारवाई

मुंबई/प्रतिनिधी : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या मैत्री या बंगल्यावर रविवारी सकाळी 7 वाजता ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय यांनी छापे टाकले.

Sanjay Raut on IT Raid : अपना भी टाईम आयेगा… (Video)
सुरक्षा सोडून येऊन दाखवा, शिंदेगटाच्या गोगावलेंची राऊतांना थेट धमकी
2024 ला सरकार बदलेल,सगळ्यांचा हिशोब हा केला जाईल

मुंबई/प्रतिनिधी : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या मैत्री या बंगल्यावर रविवारी सकाळी 7 वाजता ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालय यांनी छापे टाकले. ईडी’च्या अधिकार्‍यांकडून त्यांच्यासह कुटुंबियांचीही देखील चौकशी केली. तब्बल 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीने राऊत यांना ताब्यात घेत, त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर रात्री उशीरा त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती ईडी कार्यालयाकडून देण्यात आली.
ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर राऊत माध्यमांना संबोधित करतांना म्हणाले की, सगळ्यांना माहिती आहे की हे काय लेव्हलचा राजकारण सुरू आहे. हे शिवसेनेला कमजोर करण्याचे प्रयत्न आहेत. ते सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे की संजय राऊत यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. मात्र संजय राऊत शिवसेना सोडणार नाही आणि महाराष्ट्राची बेईमानी नाही करणार, मला अटक करायला निघालेले आहेत आणि मी अटक करून घेतोय, अशी प्रतिक्रिया राऊतांनी ईडीच्या कार्यलायबाहेरून दिली आहे.
राऊत यांच्या पत्राचाळ प्रकरणी चौकशीचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. रविवारी सकाळी 7 वाजताच राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी दाखल झाले होते. यावेळी सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले होते. ईडी कार्यालयाने राऊत यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते. मात्र, सध्या वेळ नसल्याचे राऊतांनी सांगून पुढील तारीख देण्याची मागणी केली होती. मात्र, रविवारी सकाळीच ईडीचे अधिकारी हे सुरक्षा रक्षकांबरोबर त्यांच्या राहत्या घरी दाखल झाले होते. 10 अधिकार्‍यांकडून चौकशी सुरु असतानाच आता दादर मधील फ्लॅटवरही अधिकारी पोहचले होते. त्यामुळे राऊतांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र आहे. संजय राऊत यांनी केंद्रीय संस्थाबद्दल कायम ताठर भूमिका घेतलेली आहे. शिवाय त्यांच्या कारभाराबद्दल प्रश्‍नचिन्हही उपस्थित केले होते. पत्राचाळीतील जागेच्या घोटाळ्याप्रकरणी त्यांना 1 जुलै रोजी नोटीस बजावली होती. तेव्हापासून सुरु असलेली प्रक्रिया आता थेट घरापर्यंत येऊन ठेपली आहे. एकीककडे घरात त्यांच्यासह कुटुंबियांची चौकशी सुरु असताना दुसरीकडे फ्लॅटवरही अधिकारी पोहचल्याने नेमकी काय कारवाई होणार हे पहावे लागणार आहे. या फ्लॅट खरेदीसाठी वर्षा राऊत यांच्या खात्यावर 55 लाख रुपये जमा केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळेच याची चौकशी सुरु झाली आहे.

खोटया कारवायांना भीक घालत नाही : संजय राऊत
पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचे अर्थात ईडीचे पथक रविवारी सकाळी 7 वाजता संजय राऊत यांच्या मुंबई येथील घरी दाखल होत त्यांची चौकशी केली. यावेळी “खोटी कारवाई..खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र’’ असे ट्विट संजय राऊत यांनी केले. यावेळी ईडीने त्यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रश्‍न विचारले. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली.

1034 कोटींचा पत्राचाळ घोटाळा प्रकरण
संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अडचणीत सापडले आहेत. एकूण 1034 कोटींचा हा घोटाळा असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पत्राचाळीशी संबंधित जमिनीच्या व्यवहारप्रकरणी एका महिलेला दमदाटी आणि शिवीगाळ करतानाचा फोनवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. संबंधित ऑडिओ क्लिप ही संजय राऊत यांची असल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. विशेष म्हणजे ईडीनेदेखील या क्लिपची सुमोटो दखल घेतली आहे.

COMMENTS