Homeताज्या बातम्यादेश

अखेर मुंबईतील कॉलेजच्या हिजाब बंदीला स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाने कॉलेज प्रशासनाला फटकारले

नवी दिल्ली ः मुंबईतील एन.जी. आचार्य आणि डी.के.मराठे महाविद्यालयाने हिजाबवर बंदी घातली होती. याविरोधात विद्यार्थी आणि पालकांनी उच्च न्यायालयाचे दा

पुणे पुस्तक महोत्सवात विक्रमी विक्री
आ. आशुतोष काळेंनी मुस्लीम बांधवांना दिल्या ’बकरी ईदच्या’ शुभेच्छा
रुग्णांना रक्त देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रक्तपेढ्यांवर कारवाई – आरोग्य मंत्री राजेश टोपे

नवी दिल्ली ः मुंबईतील एन.जी. आचार्य आणि डी.के.मराठे महाविद्यालयाने हिजाबवर बंदी घातली होती. याविरोधात विद्यार्थी आणि पालकांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय योग्य ठरवला होता. त्याविरोधात विद्यार्थी आणि पालकांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते, यावर शुक्रवारी सुनावणी पार पडली, यावेळी न्यायालयाने हिजाब बंदीला स्थगिती दिली आहे. कोर्टाने या प्रकरणी कॉलेज प्रशासनाने पेहरावांवर घातलेली बंदी पूर्णतः अयोग्य असल्याचे नमूद केले. तसेच तुम्ही इतर धर्माच्या बाबतीतही असाच निर्णयि घेणार का? असा प्रश्‍नही उपस्थित केला.
चेंबूर येथील ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीच्या एन. जी.आचार्य व डी के मराठे महाविद्यालयाने हिजाब, नकाब, बुरखा, टोपी सारख्या धार्मिक पेहरावांवर बंदी घातली होती. महाविद्यालयाच्या या निर्णयाला 9 विद्यार्थिनींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने महाविद्यालयाचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानंतर या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी शुक्रवारी झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती संजीव खन्ना व न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने या बंदीला स्थगिती दिली. पण त्याचवेळी मुलींना वर्गात बुरधा घालण्याची परवानगी देता येणार नाही, असेही स्पष्ट केले. नावावरून व्यक्तीचा धर्म समजत नाही का? मग तुम्ही विद्यार्थ्यांना नंबर देऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहात का? विद्यार्थ्यांना एकत्र अभ्यास करू द्या, असे कोर्ट या प्रकरणी महाविद्यालय प्रशासनाला धारेवर धरताना म्हणाले.ज्येष्ठ विधिज्ञ माधवी दिवाण यांनी यावेळी महाविद्यालयाची बाजू मांडली. न्यायमूर्ती संजय कुमार यांनी त्यांना हे महाविद्यालय केव्हा स्थापन झाले? असा प्रश्‍न केला. त्यावर दिवाण यांनी 2008 मध्ये या महाविद्यालयाची स्थापना झाल्याचे उत्तर दिले. त्यावर कोर्ट म्हणाले, मग तुम्ही एवढी वर्षे पेहरावाविषयी कोणतेही नियम का केले नाही. तुम्हालाचा आताच अनेक धर्म असल्याचा साक्षात्कार कसा झाला. एवढ्या वर्षांनंतर महाविद्यालयाने असे नियम करावेत ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.

पेहरावावर महाविद्यालय बळजबरी करू शकत नाही – सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणीवेळी विद्यार्थिनींना कोणताही पेहराव घालण्याचे स्वातंत्र्य आहे. महाविद्यालय त्यांच्यावर बळजबरी करू शकत नाही. महाविद्यालयाला आताच अनेक धर्म अस्तित्वात असल्याचा साक्षात्कार कसा झाला? हे पाहून आम्हाला आश्‍चर्य वाटते. महाविद्यालयाने पेहरावांवर घातलेली बंदी पूर्णतः अयोग्य आहे. हेच धोरण तुम्ही टिळा व टिकलीवरही लागू करणार का? मुळात धर्म कळेल असा पेहराव घालू नका असे म्हणणेच चुकीचे असल्याचे म्हणत न्यायालयाने महाविद्यालय प्रशासनाला फटकारले आहे. 

COMMENTS