Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर अमर मूलचंदानी ईडीच्या ताब्यात

पुणे ः ईडीच्या तपासात अडथळा आणणार्‍या तिघांना पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानीची चौकशी

खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी झाले हवालदिल
लढा आधी सरकारी क्षेत्र वाचविण्याचा, मग आरक्षणाचा !
राज ठाकरेंमध्ये असंतोषाचा जनक होण्याची क्षमता

पुणे ः ईडीच्या तपासात अडथळा आणणार्‍या तिघांना पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शुक्रवारी सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन अमर मूलचंदानीची चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी आले तेव्हा त्यांच्या तपासात अमर मूलचंदानीच्या दोन्ही भावाने आणि मुलाने सहकार्य केले नाही. उलट पुरावा नष्ट केला.

तपासात अडथळे आणल्याचा ठपका ठेवत रात्री पिंपरी पोलिसांनी अमर मूलचंदानीच्या दोन्ही भावाला आणि भावाच्या एका मुलाला ताब्यात घेतले आहे. तसेच, आणखी दोन महिलांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यांना रात्री नोटीस बजावून सोडून देण्यात आले होते. शुक्रवारी पिंपरी-चिंचवड मधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानींच्या घरावर ईडीने रेड टाकली. मूलचंदानींसह संचालकांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे 124 कर्ज वाटप केल्याचे आणि यातून 400 कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. पिंपरी- चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी अमर मूलचंदानी सह पाच जणांना अटक ही केली होती. काही महिन्यांपूर्वी मूलचंदानी जामिनावर बाहेर आले आणि शुक्रवारी ईडीने छापा टाकला. आरबीआयने प्रशासक नेमलेल्या या बँकेत हजारो ठेविदारांच्या कोट्यवधींचा पैसा अडकून आहे. सध्या अमर मूलचंदानी हे पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेत असून ते ईडीने त्यांना ताब्यात घेतलेले आहे.

COMMENTS