Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर दोन वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर बीड रुग्णांसाठीचा तक्रार निवारण कक्ष सुरू

बीड प्रतिनिधी - शारीरिक व्याधी आर्थिक अडचण आणि मानसिक धक्का अशी संकटाची मालिका घेऊन खाजगी रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांच्या तक्रारी सोडविण्य

*तुमचे आजचे राशीचक्र शुक्रवार, ११ जून २०२१ l पहा LokNews24*
३ वर्षाच्या अपहरण झालेल्या मुलीला पोलिसांनी केले आईच्या स्वाधीन I LOKNews24
सहकारी कारखान्यांना मिळणार शासन हमीवर कर्ज

बीड प्रतिनिधी – शारीरिक व्याधी आर्थिक अडचण आणि मानसिक धक्का अशी संकटाची मालिका घेऊन खाजगी रुग्णालयात दाखल होणार्‍या रुग्णांच्या तक्रारी सोडविण्यासाठी महाराष्ट्रात कायदा अस्तित्वात आला. मात्र कायद्यानुसार स्थापन करावयाच्या रुग्ण तक्रार निवारण कक्षाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र होते. गेल्या दोन वर्षाचा कालावधीत बीड शहरात तक्रार निवारण कक्ष स्थापन झाला नाही. ही बाब सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सरपते यांनी दि26.06.2023रोजी जिल्हा रुग्णालय येथे दिलेल्या माहिती अधिकारात पुढे आली होती.
माहिती अधिकारात रुग्णांसाठीच्या तक्रार निवारण कक्षाची माहिती पहावयास मागितली असता तक्रार निवारण कक्ष, व या कार्यालयात कोणत्याही तक्रारी प्राप्त नाहीत असे उत्तर कळवले आहे हे नसल्याने अखेर दोन वर्षाच्या अखंड प्रतीक्षे नंतर जिल्हा शल्य चिकित्सक बीड यांनी माहिती अधिकारात नमूद टोल फ्री क्रमांक मिळावा यासाठी मा.सहसंचालक आरोग्य सेवा रुग्णालये (राज्यस्तर) मुंबई यांच्याकडे मागणी करत मा. उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ लातूर यांना माहितीस्तव सादर करण्यात आले. बीड जिल्हा रुग्णालय अतिरिक्त शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयासमोर तक्रार निवारण कक्ष फलक लावून रुग्णांसाठीचा तक्रार निवारण कक्ष स्थापन केला. या कक्षात कार्यरत डॉ.संजय बळीराम राऊत वैद्यकीय अधिकारी वर्ग 1, डॉ.रामेश्वर नारायण आव्हाड वैद्यकीय अधिकारी,श्री सागर दौलत पाटील समाजसेवा अधीक्षक बीड त्यांची नेमणूक केली असून सामाजिक कार्यकर्ते मिलिंद सरपते यांच्या माहिती अधिकार अर्जला उत्तर देत तक्रार निवारण कक्ष स्थापन केला व तात्पुरता कार्यालयीन दूरध्वनी क्र 02442 222618 दिला आहे. असल्याचे म्हंटले आहे.तरी मी मिलिंद सरपते बीड जिल्हा वाशियांना आवाहन करतो की खाजगी रुग्णालयासंबंधी कोणतीही दरपत्रक लावले नसल्यास, रुग्णहक्कसनद, बिल या सह अनेक तक्रार असल्यास जिल्हा रुग्णालय बीड येथे आपली रीतसर तक्रार दाखल करावी.

COMMENTS