नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये पुन्हा एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. या दहशतवाद्याचे नाव अब्दुल रहमान असून तो दहशतवाद्यांना फंडिग करायचा,

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये पुन्हा एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. या दहशतवाद्याचे नाव अब्दुल रहमान असून तो दहशतवाद्यांना फंडिग करायचा, तसेच तो हाफिज सईदच्या अतिशय जवळचा होता. याला कराची गोळ्या घालण्यात आल्या आहेत. लष्कर-ए-तैयबासाठी निधी जमा करणार्या अब्दुल रहमानवर कराचीमध्ये अज्ञात बंदुकधार्यांनी गोळीबार केला. त्यामध्ये त्याचा जीव गेला आहे.
हाफिज सईद हा भारताचा कट्टर दुश्मन असून भारतातील अनेक दहशतवादी कृत्यांमध्ये त्याचा सहभाग आहे. आता त्याच्या खास मित्राची हत्या झाली असून सईदसाठी हा धक्का असल्याचे सांगितले जात आहे. हाफिज सईदच्या मित्रावर, अब्दुल रहमानवर हा हल्ला झाला त्यावेळी त्याच्यासोबत त्याचे वडील आणि इतर काही लोक होते. या हल्ल्यात त्याच्या वडिलांसह तीन जण गंभीर जखमी झाले. तर अब्दुल रहमानचा जागीच मृत्यू झाला.
COMMENTS