मुंबई :राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगाने केले होते. तसेच आचारसंहितेच्
मुंबई :राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगाने केले होते. तसेच आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणार्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार, राज्य सरकारने शनिवारी लाडकी बहीण योजनेला बे्रक लावला आहे.
महिला आणि बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे. त्यामुळे आचारसंहिता संपेपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज देखील भरता येणार नाही, तसेच कुणाच्या खात्यात पैसेही पाठवता येणार नाही. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणार्या आर्थिक योजना बंद करण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे. त्यानुसार, महिला व बालकल्याण विभागाने लाडकी बहीण योजनेला दिला जाणारा निधी थांबवला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिला लाभार्थ्यांना मिळणार नाहीत. उल्लेखनीय बाब म्हणजे सरकारने सदर योजनेंतर्गत आतापर्यंत 2 कोटी 40 लाखांहून अधिक पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये या प्रमाणे 5 महिन्यांचे हप्ते जारी केले आहेत. त्यातही सरकारने ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे पैसे अगोदरच खात्यात जमा केलेत. आता निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार या योजनेला दिला जाणारा निधी थांबवण्यात आल्यामुळे महिलांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
COMMENTS