नवी दिल्ली : देशातील बहुचर्चित बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींची मुदतपूर्व सुटका केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप

नवी दिल्ली : देशातील बहुचर्चित बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींची मुदतपूर्व सुटका केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी आगामी 2 मे रोजी न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे.
या प्रकरणावर मंगळवारी झालेल्या सुनावणीत गुजरातसरकारने दोषींच्या सुटकेसंदर्भातील फाईल दाखवण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचा विरोध केला. तर, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानेच दोषींची सुटका करण्यात आल्याचे राज्य सरकारने म्हटले. याप्रकरणी खासदार महुआ मोईत्रा आणि सामाजिक कार्यकर्ता सुभाषिनी अली यांनी सर्वोच्च न्यायालयात गुजरात सरकारचा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे.
COMMENTS