पायी फिरायला जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील गंठणावर फिल्मीस्टाईलने डल्ला

Homeताज्या बातम्या

पायी फिरायला जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील गंठणावर फिल्मीस्टाईलने डल्ला

अभिजित खंडागळे/पाथर्डी : रस्त्याने पायी फिरायला जाणाऱ्या आशा गुगळे या महिलेच्या गळ्यातील बेचाळीस हजार रुपयांचे मिनी गंठण पाठीमागून मोटरसायकलवरून येत

काँग्रेसची गळती थांबेना ; कपिल सिब्बल राजीनामा
विधान परिषदेच्या निवडणुकीवर ठाकरे गटाचा आक्षेप
चार वर्षाच्या विद्यार्थ्याला मुख्याध्यापिकेची मारहाण ?

अभिजित खंडागळे/पाथर्डी : रस्त्याने पायी फिरायला जाणाऱ्या आशा गुगळे या महिलेच्या गळ्यातील बेचाळीस हजार रुपयांचे मिनी गंठण पाठीमागून मोटरसायकलवरून येत एका अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याची भीतीदायक घटना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास धामणगाव रोडवर घडली;दरम्यान याबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डांगे करत आहेत.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की,आशा गुगळे या धामणगाव रोडने नियमितपणे संध्याकाळी फिरण्यासाठी जातात.त्याप्रमाणे मंगळवारी त्या संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरापासून धामणगाव रोडने जात असताना पाठीमागून मोटरसायकलवर येणाऱ्या एका अज्ञात इसमाने त्यांच्या गळ्याला हिसका देऊन बळजबरीने गळ्यातील सोन्याचे गंठण तोडून नेले आहे. शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर त्या परिसरात पायी फिरायला जात असून सदरील घटनेनंतर महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तरी दिवसाढवळ्या चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांच्या कामगिरीवर नागरिकांमधून निराशा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS