Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विशाल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

सांगली : महाविकास आघाडीमध्ये सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून चांगलीच रस्सीखेच बघायला मिळत होती, त्यावर चर्चा होऊन सांगलीची जागा ठाकरे गटाला सोडण्य

मोहम्मद फैजल यांना पुन्हा खासदारकी बहाल
पालघर साधू हत्याकांडाचा तपास सीबीआयकडे
महायुतीचे काम हीच आमची ओळख : मुख्यमंत्री शिंदे

सांगली : महाविकास आघाडीमध्ये सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून चांगलीच रस्सीखेच बघायला मिळत होती, त्यावर चर्चा होऊन सांगलीची जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली होती, त्यानंतर सांगली काँगे्रसमध्ये आक्रमक प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. सांगलीच्या जागेचा फेरविचार करावा अशी मागणी करण्यात आली होती, मात्र तरी देखील ही जागा ठाकरे गटाला सोडण्यात आली होती. आता विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सांगली मतदारसंघावरून जोरदार रस्सीखेच झाली होती. मात्र हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेला. यामुळे नाराज असलेले विशाल पाटील यांनी आज मोजक्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.

COMMENTS