सातारा प्रतिनिधी - छत्रपती संभाजी नगरच्या नामांतरावरून सुरू असलेले एम आय एम चे खा. इम्तियाज जलील यांच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकल्या

सातारा प्रतिनिधी – छत्रपती संभाजी नगरच्या नामांतरावरून सुरू असलेले एम आय एम चे खा. इम्तियाज जलील यांच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकल्याने या घटनेचा सातारच्या राजघराण्यातील आ. शिवेंद्रसिंहाराजे भोसले यांनी तीव्र निषेध व्यक्त केला असून ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांच्या विरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ज्यांना औरंगजेबाचे उदात्तीकरण करायचे आहे त्यांनी महाराष्ट्र सोडावा असा सवाल उपस्थित करत एम.आय.एम चे खा.इम्तियाज जलील यांनी सुरू केलेल्या नामांतराच्या आंदोलनाला देखील आ. शिवेंद्रसिंहाराजे भोसले यांनी जाहीर विरोध दर्शवला आहे.
COMMENTS