रायगडावर अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रायगडावर अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा

अहमदनगर/प्रतिनिधी : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या ‘किल्ले रायगडा’वर अनध

संभाजी ब्रिगेडच्या वतीने बळी महोत्सवाचे आयोजन
जिल्ह्यातील 67 हजार दूध उत्पादक शेतकर्‍यांना 61 कोटींचे अनुदान
संजीवनीच्या चार विद्यार्थ्यांची परदेशात निवड – अमित कोल्हे

अहमदनगर/प्रतिनिधी : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या ‘किल्ले रायगडा’वर अनधिकृत बांधकाम केल्याचे उघड झाले असून, ते करणार्‍यांवर व त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधित अधिकार्‍यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे.
हिंदु जनजागृती समितीने रायगड जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. या वेळी समितीच्या विशाखा आठवले, गिरीश जोशी आणि उदय तेली उपस्थित होते. मंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनाही समितीच्यावतीने या विषयासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.
यासंदर्भात हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक (महाराष्ट्र आणि छत्तीसगड) सुनील घनवट यांनी सांगितले की, किल्ले रायगडावरील अतिक्रमणाबाबत सोशल मीडियावर याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. किल्ल्यावरील ‘मदार मोर्चा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या जागी ‘मशीद मोर्चा’ असल्याचा अपप्रचार केला गेला. ऐतिहासिक स्थळांवर असे प्रकार होणे, हे संतापजनक असून रायगड किल्ल्याचे पावित्र्य भंग करण्याचा प्रकार आहे. तसेच यातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचाही प्रयत्न दिसून येतो, असा दावाही त्यांनी केला.
या प्रकरणी त्वरित आवाज उठवल्याने हे अनधिकृत बांधकाम काढण्यात आले असले, तरी हे बांधकाम कोणी केले, कोणत्या उद्देशाने केले याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे व दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी असल्याचे सांगून ते म्हणाले, किल्ले विशाळगडावर पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे 100 हून अधिक लहान-मोठी अतिक्रमणे झालेली आहेत. दुसरीकडे बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी उघड्यावर आहेत. एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर होत असलेले अतिक्रमण हा गंभीर विषय आहे. ही अतिक्रमणे तात्काळ हटवणे, हे प्रशासनाचे कर्तव्यच आहे. या प्रकरणी ज्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे हे घडले, त्यांच्यावर आणि अतिक्रमण करणार्‍या सर्वांवर तत्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी आमची मागणी आहे, असे ते म्हणाले.

अन्य किल्लेही तपासा
किल्ले रायगडाप्रमाणे राज्यातील सर्वच किल्ल्यांच्या ठिकाणी अशी अतिक्रमणे झाली आहेत का, याचा अहवाल शासनाला सादर करून ती अतिक्रमणे तात्काळ हटवण्याची प्रक्रिया चालू करावी. आमच्या मागण्यांवर पुरातत्व खाते आणि प्रशासन यांनी कृती न केल्यास हिंदु जनजागृती समिती या प्रकरणी राज्यभरात आंदोलन छेडेल. छत्रपती शिवरायांच्या वास्तूंवर होत असलेली अतिक्रमणे कदापि सहन केली जाणार नाहीत, याची गंभीर दखल प्रशासन आणि पुरातत्त्व विभाग यांनी घ्यावी, असेही समितीने निवेदनात म्हटले आहे.

COMMENTS