आमदार जगतापांच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करा : भाजपने केली मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार जगतापांच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करा : भाजपने केली मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर लावण्यात आलेल्या गाण्यावरचा लोकप्रतिनिधीचा डान्स सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. महा

पोलिस ठाणे व कर्मचार्‍यांच्या निवास स्थानासाठी निधी द्या
पाथर्डी येथील शासकीय वसतिगृहात‌ मागासवर्गीय ‌विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवाहन
डॉ. पोखरणा यांच्या जामिनावर 23 नोव्हेंबरला होणार सुनावणी

अहमदनगर/प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर लावण्यात आलेल्या गाण्यावरचा लोकप्रतिनिधीचा डान्स सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. महाराजांच्या पुतळ्यासमोर अशा पद्धतीने जो काही धिंगाणा आमदार व त्यांच्या इतर सहकार्‍यांनी घातला, तो निषेधार्ह आहे. विशेष म्हणजे प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. त्यामुळे, हिंदुस्थानच्या दैवतासमोर हिडीस प्रकार करणार्‍या आमदार व त्यांच्या सहकार्‍यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा व अ‍ॅड. अभय आगरकर यांनी मंगळवारी केली.
यावेळी लोढा व आगरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आमदार संग्राम जगताप व त्यांच्या सहकार्‍यांनी जो काही धिंगाणा घातला, अश्‍लील गाणे वाजवून जो हिडीस प्रकार केला, तो निषेधार्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमानच आहे. याप्रकरणी आमदार जगताप यांच्यासह सहकार्‍यांनी महाराजांच्या पुतळ्यासमोर नुसतं नाक रगडून नव्हे तर साष्टांग दंडवत घालून माफी मागावी. तसेच कोविडच्या काळातही झालेल्या या प्रकारासंदर्भात आमदार जगताप यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांवर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. बेरड, माजी नगरसेवक सचिन पारखी, भाजपचे पदाधिकारी तुषार पोटे, महेश नामदे, किशोर बोरा, संतोष गांधी उपस्थित होते. मात्र, शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यावेळी उपस्थित नव्हते.
आगरकर म्हणाले की, शहराचे लोकप्रतिनिधी जगताप यांनी अखंड हिंदू समाजाचा विश्‍वासघात केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्यासमोर अशी गाणी लावत लोकप्रतिनिधीच तेथे नाचतात, ते अतिशय घृणास्पद आहे. ज्यांना छत्रपतींचा इतिहास माहिती नाही, अशा लोकांच्या ताब्यात शहराची सूत्रे आहेत व ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी लज्जास्पद गोष्ट आहे. या प्रकारामुळे पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे, असा दावाही आगरकर यांनी केला.
मुळातच या पुतळ्याच्या रंगरंगोटीचे काम हे महापालिकेकडून करण्यात आले होते. या पुतळ्याचे लोकार्पण सुशोभीकरण व त्याचे उदघाटन कोणी करायचे, कोणाच्या हस्ते करायचे, हा महापौरांचा अधिकार आहे. त्याच महापौरांना दीड तास ताटकळत उभे करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊनही, शिवप्रेमींचा विश्‍वासघात होऊनही शिवसेनेने या प्रकारासंदर्भात कोणतीही ठोस भूमिका न घेता केवळ त्यांची आघाडी वाचवण्यासाठी बोटचेपी भूमिका घेतल्याचा टोलाही आगरकर यांनी यावेळी शिवसेनेला लगावला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचे यापूर्वीच लोकार्पण झाले आहे. भाजपचे दिवंगत खासदार दिलीप गांधी यांच्या पुढाकारातून तेथे यापूर्वी सुशोभीकरण करण्यात आलेले आहे व ते आजही सुस्थितीत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत त्याचे लोकार्पण झाले होते. त्यामुळे आता पुन्हा लोकार्पण कशाचे? असा सवाल करीत लोकप्रतिनिधींना अनावरण आणि सुशोभीकरण यातील फरक कळत नाही, हेच या शहराचे दुर्दैव आहे, अशी टीकाही लोढा व आगरकर यांनी केली. दरम्यान, या पुतळ्याशेजारी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामामुळे उड्डाण पुलावरून जाणार्‍यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन होऊ शकणार नाही. त्यामुळे महापालिकेने उड्डाणपूल कार्यान्वित होण्यापूर्वी महापालिकेने पुतळ्याची उंची वाढवावी, अशी मागणी प्रा. बेरड यांनी केली.

COMMENTS