Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंधरावा वित्त आयोगाचे पाच लक्ष व पाणीपुरवठा चे दोन लक्ष रुपये खर्चाच्या अनियमित्ततेची चौकशीची मागणी.

किनवट प्रतिनिधी - तालुक्यातील पेसा क्षेत्रात येणार्‍या गौरी ,सुभाष नगर ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक श्री बल्लूरकर यांनी 15 वा वित्त आयोगाच्या

बालाजी रोहिलावार यांच्या देशी- विदेशी दारूच्या दुकानाची राज्य उत्पादन विभागाकडे तक्रार
परशुराम जयंती निमित्ताने मोटार सायकल रॅली
कन्नड तालुक्यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

किनवट प्रतिनिधी – तालुक्यातील पेसा क्षेत्रात येणार्‍या गौरी ,सुभाष नगर ग्रामपंचायतचे तत्कालीन ग्रामसेवक श्री बल्लूरकर यांनी 15 वा वित्त आयोगाच्या कामातील पाच लक्ष रुपये व पाणीपुरवठा योजनेच्या कामातील दोन लक्ष रुपये असे सात लक्ष रुपये कामात केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी माजी उपसरपंच जीवला नाइक यांनी केली आहे. मागासवर्गीय आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी प्रशासनाने महत्त्वकांक्षी योजना राबवून पेसा क्षेत्रातील नागरिकांना सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा सकारात्मक प्रयत्न असताना अशा प्रशासनातील ग्रामसेवकाकडून पैशाची अपरातपर करीत स्वतःच्या नावे आरटीजीएस ने पैसे आपल्या खात्यात वळवल्याचा माजी उपसरपंच जीवला नाईक यांचा आरोप असल्याने शासना च्या झाले ल्या फसवणूकीची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांना निलंबित करण्यात यावे. तत्कालीन कालावधीत गावात वापरण्यात येणार्‍या सर्व वस्तू सारखणी येथून तर काही किनवट येथून उधारीने जसे की पाण्याची टाकी, इलेक्ट्रिक मोटार, एलईडी बल, पाईपलाईन कामगाराचे कामाचे पैसे हे अद्याप देणे बाकी असल्याने गावातील जबाबदार नागरिक या नात्याने संबंधित एजन्सीचे मला फोन येत असल्याचे जिवला नाईक यांनी लोकमंथनशी बोलताना स्पष्ट केले. श्री बल्लूरकर ग्रामसेवक बेंदी तांडा येथे रुजू असल्याचे समजते. तेव्हा तत्कालीन कालावधीतील पंधराव्या वित्त आयोगातून आणि पाणीपुरवठा योजनेच्या खर्चाच्या अनियमिततेची चौकशी तात्काळ करण्यात यावी अन्यथा एक मे कामगार दिनी पंचायत समिती कार्यालयासमोर संबंधित ग्रामसेवकाच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आमरण उपोषण करण्याचा इशारा माजी उपसरपंच जेवला नाईक यांनी दिला आहे.

COMMENTS