Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

…तोपर्यंत फेटा बांधणार नाही ः पंकजा मुंडे

बीड/प्रतिनिधी : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, असा निर्धार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये एका सभेत केला. मला राजेंद्र

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट
राज्याच्या मंत्रिपदी नियुक्तीनंतर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं औक्षण केलं.
जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, पंकजांचा धनंजय मुंडेंवर हल्ला (Video)

बीड/प्रतिनिधी : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, असा निर्धार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये एका सभेत केला. मला राजेंद्र मस्के म्हणाले, फेटा बांधा. मी म्हटले, फेटा बांधणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी फेटा बांधणार नाही. ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आल्यावर गळ्यात कोणतीही फुलाची माळ गळ्यात घालणार नाही, असे सांगितले होते. आता ओबीसी आरक्षण वाचले आणि लोकांनी गळ्यात हार घातले, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
दूध पोळले आहे त्यामूळे ताक फुंकून प्यायचे,  2024 ला इतिहास घडवायचा आहे, असे म्हणत पंकजा मुंडेंनी सूचक विधान केले आहे. 2019 मध्ये जे विजयात आडवे आले त्यांना येत्या निवडणुकीत आडवा करू. 2024 मध्ये विजयी कौल मिळवण्यासाठी मी आता माझी भूमिका घेतली. पक्ष काय डिक्लेअर करेल ते करेल पण माझी मी भूमिका घेतली ती फायनल असल्याचे देखील स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मोदींचे यशस्वी 9 वर्ष याची माहिती सांगायला मी मध्य प्रदेशमध्ये नक्षलग्रस्त भागात  गेले होते. त्यावेळी मी सुरक्षा नाकारली. कारण त्या ठिकाणीं मुंडे साहेबांची आठवण सांगणारे भेटले. या जिल्ह्यात आईची माया दाईला येत नसते. 2019 ला यशामध्ये आडवे येणार्‍याला निवडणुकीत आडवा करु अस पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच आम्ही सरकारमध्ये असताना शेतकर्‍यांना अनुदान वेळेवर यायचे, यावर्षी चारशे कोटींची मागणी केल्यावर पदरात फक्त 192 कोटी मिळाले त्यासंदर्भात देखील बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा प्रश्‍न घेऊन एकनाथजी शिंदे साहेब जे गरीबांचे मुख्यमंत्री आहेत त्यांना जाऊन भेटा अशा सूचना देखील केल्या. वंचित पीडितांची कोणती जात नसते, ही मुंडे साहेबांची शिकवण आहे. माझ्या लोकांची कामं झालेली नाही. की माझ्या हृदयात दुखतं. मराठा आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधून घेणार नाही, फेटा घालून मिरवणार नाही. काही माध्यमांनी विचारलं ताई तुम्ही आमदार नाही खासदार नाही झालात, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही तरी एवढी चर्चा का. त्यावर सर्व समावेशक चेहरा पंकजा मुंडे झाल्या आहेत. अशी प्रतिक्रिया दिली मी जी भूमिका घेतली ती घेतली. 2024 ला ऐतिहासिक विजय मिळवायचा असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

COMMENTS