Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्त्रीवादी लेखिका विद्युत भागवत यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका आणि महाराष्ट्रातील स्त्री चळवळीच्या अग्रणी कार्यकर्त्या डॉ. प्रा. विद्युत भागवत यांचे गुरुवारी रात्री निधन झाले.

जलजीवन मिशन योजने अंतर्गत कामाची चौकशी करावी
म्हाडाच्या सोडतील यंदा अल्प प्रतिसाद
एकीकडे दिलासा दुसरीकडे टांगती तलवार

पुणे : ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका आणि महाराष्ट्रातील स्त्री चळवळीच्या अग्रणी कार्यकर्त्या डॉ. प्रा. विद्युत भागवत यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्या 77 वर्षांच्या होत्या. हृदयविकाराने त्यांचेे निधन झाले आहे. विद्युत भागवत यांच्या मागे एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. विद्युत भागवत यांनी जवळपास तीन दशके स्त्री चळवळीत काम केले असून देशातील सामाजिक परिस्थितीवर त्यांनी अनेक लेख आणि पुस्तकेही लिहिली आहेत. प्रसिद्ध लेखक आणि फास्टर फेणे फेम भा. रा. भागवत यांच्या त्या सून होत्या. विद्युत भागवत या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिला अध्ययन केंद्राच्या संस्थापक संचालिका होत्या.

COMMENTS